CoronaVirus News: देशभरात गेल्या 24 तासांत 6,535 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या 1.45 लाखवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:36 AM2020-05-26T11:36:29+5:302020-05-26T11:40:17+5:30

महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपर्यंत 2,436 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर पोहोचला आहे. यापैकी 1695 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus update india covid-19 uncontrolled in maharashtra delhi tamil nadu and gujarat sna | CoronaVirus News: देशभरात गेल्या 24 तासांत 6,535 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या 1.45 लाखवर

CoronaVirus News: देशभरात गेल्या 24 तासांत 6,535 जणांना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या 1.45 लाखवर

Next

नवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता 1 लाख 45 हजारच्याही पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या माहितीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 380 झाली आहे. यापैकी 4 हजार 167 जणांचा मृत्यू झाला. तर 60 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

देशात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार 535 नवे कोरोना रुग्ण आढलून आले. तर 146 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 80 हजारहून अधिक आहे. 

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

महाराष्ट्राची स्थिती -
महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपर्यंत 2,436 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 52 हजार 667 वर पोहोचला आहे. यापैकी 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15,786 रुग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35178 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

दिल्लीची स्थिती -
दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजारवर पोहोचला आहे. येथे  आतापर्यंत 276 जणांचा कोरोनामुळे मृत्यी झाला आहे. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात कोरनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. आता राजस्थानातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7, 300 वर पोहोचल आहे. तर 167 जणांचा मृत्यू झाला आहे.

मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात

तामिळनाडूची स्थिती -
तामिळनाडूतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 17 हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर 118 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडूनंतर आता गुजरातमध्येही कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या आता 14 हजार 460 वर पोहोचली आहे. तर 888 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

Read in English

Web Title: Coronavirus update india covid-19 uncontrolled in maharashtra delhi tamil nadu and gujarat sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.