शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Coronavirus: कोरोना मुक्तीनंतरही बारा आठवडे काळजीचे, ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:45 IST

Coronavirus in India: कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तब्येतीची नीट काळजी घेण्याकडेही रुग्णांनी लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्याची काही लक्षणे बराच काळ मागे उरतात. अनेकांना श्वास घेण्यात अडचणी येतात. काहींच्या फुप्फुसात दोष निर्माण होतो. बरे झाल्यानंतरही त्या व्यक्तींना अनेक आठवडे खोकला, सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सतत थकवा जाणवतो किंवा सांधेदुखी सुरू होते. कोरोनाचा संसर्ग जसा कमी होईल तसे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढत जाईल. त्या लोकांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे नवे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहील. गावांमध्ये कोनारोला रोखण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लहान मुलांना फार झळ पोहोचली नव्हती. मुलांना कोरोना झाला तरी त्याची लक्षणे खूप कमी असतात. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका आहे, असे सांगितले जात आहे. मात्र हा संसर्ग कमी की जास्त प्रमाणात होईल, हे आताच सांगता येणार नाही.नव्या कोरोना रुग्णांत घट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ७ मे रोजी देशात एकाच दिवसात सर्वाधिक ४.१४ लाख नवे कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र त्यात नंतर घट झाली. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे २.२२ लाख नवे रुग्ण आढळले. गेल्या चाळीस दिवसांतील हा नीचांक आहे. दर दिवशी कोरोनाचे १०० रुग्ण आढळतात, अशा जिल्ह्यांची संख्या ४ मे रोजी ५३१ होती. ती आता ४३१ पर्यंत खाली घसरली आहे. 

बरे होणाऱ्यांची संख्या अधिकनव्या रुग्णांच्या संख्येत घट होण्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ३ मे रोजी ८१.७ टक्के होते. गेल्या ११ दिवसात बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. २७ राज्यांत सध्या ही स्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य