शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, मुलांवर अधिक परिणाम : SBI Report

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:09 IST

coronavirus third wave : या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. असे असले तरी कोरोनाची तिसरी लाटही (coronavirus third wave) देशात लवकरच येणार असल्याची चिंताजनक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात येऊ शकते. (coronavirus third wave may start from next month in india says sbi report)

याचबरोबर, या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 7 मे रोजी भारतातील कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. "सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात जवळपास 10,000 कोरोनाची प्रकरणे पोहचू शकतात. मात्र, ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यापर्यंत कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात."

दुसऱ्या लाटेसारखी तिसरी लाट गंभीर असू शकतेरिपोर्टनुसार, जागतिक आकडेवारीवरून समजते की, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत जास्त लोकांना संसर्ग होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, या लाटेचा परिणाम जवळपास 98 दिवस राहू शकतो. या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, तिसरी लाट दुसऱ्या लाटे इतकीच गंभीर असू शकते. मात्र, सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेचाही लोकांना फायदा होईल. या लाटेत मृतांचा आकडा दुसर्‍या लाटपेक्षा कमी असू शकतो. याचबरोबर, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विकसित देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा कालावधी 108 दिवस आणि तिसर्‍या लाटेचा कालावधी 98 दिवसांचा आहे. यादरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी जर चांगली तयारी केली गेली तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकतो.

मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतोया तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर अधिक दिसून येऊ शकतो. तसेच, यादरम्यान, सर्व लोकांचे प्राधान्य कोरोनावरील लस असले पाहिजे. देशात 12-18 वर्ष वयोगटातील 15-17 कोटी मुले आहेत. विकसित देशांप्रमाणेच या वयोगटातील लसी विकत घेण्यासाठी भारतानेही आगाऊ धोरण आखले पाहिजे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या 24 तासांत 39 हजार 796 रुग्णांची नोंददेशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 39 हजार 796 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 723 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात सलग सातव्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येचे नोंद करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यातही घट झाली आहे. याचबरोबर, देशात गेल्या 24 तासांत 14 लाख 81 हजार 583 कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात रविवारी 15 लाख 22 हजार 504 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 41 कोटी 97 लाख 77 हजार 457 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSBIएसबीआयIndiaभारतHealthआरोग्य