शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

सावधान...! कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही...; सरकारचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 6:00 PM

देशातील 12 राज्यांत 1 लाखहून अधिक सक्रिय रुग्ण, तर 7 राज्यांत 50 हजार ते 1 लाखदरम्यान सक्रिय रुग्ण...

नवी दिल्ली - कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी लोकांना बेडसाठी संघर्ष करावा लागत आहे. तर अनेकांचा ऑक्सिजनवाचून मृत्यू होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी राज्यांना कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही, असे प्रिंसिपल सायंटिफिक अॅडव्हायझर विजय राघवन यांनी म्हटले आहे. (CoronaVirus the third wave of Corona will come, no one can stop says Principal Scientific Advisor Vijay Raghavan)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देताना विजय राघवन म्हणाले, कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही. मात्र, केव्हा येणार? कसा इफेक्ट करेल? हे सांगणे सध्या अवघड आहे. मात्र, यासाठी आपल्याला तयार रहावे लागले. 

Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार

24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्थिती कठीण -24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. छोट्या शहरांत विशेष लक्ष देण्याची आश्यकता आहे. कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. तर पुण्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशातील 12 राज्यांत 1 लाखहून अधिक सक्रिय रुग्ण -देशातील 12 राज्यांत 1 लाखहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 7 राज्यांत 50 हजार ते 1 लाखदरम्यान सक्रिय रुग्ण आहेत आणि 17 राज्यांत 50 हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात 1.5 लाख सक्रिय रुग्ण आहेत, असे लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

भारतात कोरोना लसीकरण अभियानापासून ते आतापर्यंत 16 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 109 दिवसांचा कालावधी लागला आहेत. केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्यान मंत्रायलाने यासंदर्भात माहिती दिली. या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारताच्या तुलनेत अमेरिकेला 111 दिवस, तर चीनला 116 दिवस लागले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

CoronaVirus : भारतात हाहाकार माजवतोय कोरोनाचा इंडियन व्हेरियंट; जाणून घ्या, किती आहे घातक?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीMumbaiमुंबई