शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

CoronaVirus: टाटा ट्रस्टकडून पुन्हा मदतीचा हात; अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 8:16 PM

coronavirus कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी १५०० कोटींची मदत जाहीर केल्यानंतर पुन्हा टाटा सरसावले

मुंबई: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा टाटा देशाच्या मदतीला धावले आहेत. पीपीई किट्स, सर्जिकल मास्क, ग्लोव्ज यासारख्या अत्यावश्यक वस्तू एअरलिफ्ट करण्याचं काम आता टाटा ट्रस्टकडून करण्यात येईल. १५० कोटी रुपयांचं वैद्यकीय  साहित्य टाटा ट्रस्टकडून देशभरात एअरलिफ्टच्या माध्यमातून देशभरात पोहोचवलं जाईल. टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या मदतीनं ही मदत पोहोचवली जाण्यात येणार असल्याची माहिती टाटा ट्रस्टनं दिली आहे.टाटा ट्रस्टकडून कव्हरऑल्स, मास्क, ग्लोव्ज यांचा समावेश असलेली पीपीई किट्स, एन ९५/केएन ९५ मास्क आणि सर्जिकल मास्क देशभरात पोहोचवले जाणार आहेत. 'येत्या काही आठवड्यांमध्ये विविध टप्प्यांमध्ये सर्वाधिक आवश्यकता असलेल्या भागांमध्ये वैद्यकीय साहित्य पाठवलं जाईल. या साहित्याचं मूल्य १५० कोटी रुपये इतकं असेल,' अशी माहिती टाटा ट्रस्टनं प्रसिद्धीपत्रकातून दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव माणसासमोरील कठीण संकट असून त्याचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय वस्तू तातडीनं गरज असलेल्या ठिकाणी पोहोचवायला हव्यात, अशा सूचना रतन टाटांनी दिल्यानंतर टाटा ट्रस्टनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहानं याआधी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी १५०० कोटी रुपयांच्या मदत जाहीर केली असून यातले ५०० कोटी रुपये टाटा ट्रस्टनं दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTataटाटाRatan Tataरतन टाटा