शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

CoronaVirus News: मोठा दिलासा! भारतातील कोरोनाबद्दल महत्त्वाची माहिती समोर; आता लढा होणार सोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 09:58 IST

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतेय; सध्या दिवसाला ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येताहेत

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतात पसरलेला कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, बहुतांश केसेस युरोपशी संबंधित आहेत. याआधी देशात पसरलेला कोरोना विविध प्रकारचा होता. मात्र आता एकाच प्रकारच्या कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती पुढे आली आहे. एकाच प्रकारचा कोरोना असल्यानं आता त्याचा मुकाबला करणं सोपं असेल. सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास बऱ्यापैकी मदत झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे.जैवतंत्रज्ञान विभागानं कोरोनाबद्दलचा अहवाल तयार केला आहे. शनिवारी हा अहवाल आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना सोपवण्यात आला. देशात कोरोनाचा A2a होलोटाईप विषाणूचा वेगानं फैलावत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या विषाणूनं दुसऱ्या प्रकारच्या विषाणूला हटवलं आहे. सुरुवातीला भारतात कोरोना विषाणूच्या विविध प्रजाती पाहायला मिळत होत्या. यामध्ये युरोप, अमेरिका आणि पूर्व आशियातून आलेल्या कोरोनाच्या प्रजातींचा समावेश होता.जगभरात कोरोना विषाणूच्या विविध प्रजातींचा फैलाव झाला आहे. यामध्ये A2a होलोटाईप, D614G, 19A आणि 19B चा समावेश आहे. भारतात आधी सर्व प्रजातींमधील कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. A2a होलोटाईप विषाणू युरोप आणि सौदी अरेबियातून भारतात आला. याआधी जानेवारीत आलेला विषाणू वुहानमधून आला होता. हा विषाणू 19A आणि 19B प्रजातीमधील होता. मात्र त्यांचं प्रमाण A2a च्या तुलनेत कमी होतं. त्यानंतर देशात केवळ A2a होलोटाईप शिल्लक राहिला. दिल्लीत D614G प्रकारच्या विषाणूचा फैलाव झाला होता. त्याचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. त्यामुळेच राजधानीतील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं कमी होताना दिसत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या