शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : इराणमधून लष्कराच्या विशेष विमानाने १९५ भारतीयांना परत आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:19 IST

भारतीय नागरिकांवर उपचारासाठी इराण सरकारने असमर्थता दर्शविली होती..

ठळक मुद्देजैसलमेर येथील केंद्रात दाखल : सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर ४८४ नागरिकांवर विलगीकरण कक्षात प्रथमोपचार सुरू

पुणे: इराणमधून लष्कराच्या विशेष विमानाने बुधवारी सायंकाळी १९५ भारतीयांना देशात परत आणले. त्यांच्यावर जैसलमेर येथील लष्करी स्वस्थता केंद्रातील विलगीकरण कक्षात प्रथमोपचार सुरू केले आहे. आतापर्यंत इराणमधून ४८४ भारतीयांना लष्कराने परत आणले. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. असे असले, तरी लष्कराची आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक आहेत. इराणमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तेथील भारतीय नागरिकांवर उपचारासाठी इराण सरकारने असमर्थता दर्शविल्यानंतर भारत सरकारने लष्कर व हवाईदलाच्या मदतीने भारतीय आरोग्य पथक इराणला पाठवले होते. यासोबतच भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी तिसºया खेपेत जवळपास १९५ भारतीयांना सुरक्षित देशात आणले. परदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणीसाठी तसेच उपचारासाठी लष्करातर्फे  जैसलमेर येथे लष्करी स्वस्थता केंद्र उभारले आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व नागरिकांना येथे ठेवले आहे. संशयित रुग्णांसाठी विशेष विलगीकरण कक्ष तयार केले आहे. त्याठिकाणी कोरोनाच्या प्राथमिक चाचण्या तसेच नमुने घेऊन त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या आहेत. शुक्रवारी (दि.१३) २३६ नागरिकांना इराण येथून भारतात आणले होते. रविवारी (दि.१५) ५३ भारतीयांना भारतात परत आणले. बुधवारी (दि.१८) १९५ भारतीयांना भारतात परत आणले आहे. सर्व नागरिक लष्करी स्वस्थता केंद्रातील आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहे. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. सर्व नागरिकांच्या आरोग्य सुविधांबरोबरच त्याच्या खानपानाचीही व्यवस्था लष्कराकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेIranइराणcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारIndian Armyभारतीय जवान