coronavirus: special attention on the 11 cities in Fifth stage of lockdown BKP | coronavirus: ११ शहरांवर विशेष लक्ष; धार्मिक स्थळे, सलून-जिमला मिळणार सूट? असा असू शकतो लॉकडाऊनचा पाचवा टप्पा

coronavirus: ११ शहरांवर विशेष लक्ष; धार्मिक स्थळे, सलून-जिमला मिळणार सूट? असा असू शकतो लॉकडाऊनचा पाचवा टप्पा

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या देशभरातील ११ शहरांमध्ये विशेष लक्ष देण्यात येण्याची शक्यता कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेले भाग वगळून देशातील जनतेला विविध बाबतीत लक्षणीय सवलत मिळू शकते लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारकडून धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन सरसकट शिथील होण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यााबत देशवासियांसोबत लवकरच मन की बात करण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या देशभरातील ११ शहरांमध्ये विशेष लक्ष देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेले भाग वगळून देशातील जनतेला विविध बाबतीत लक्षणीय सवलत मिळू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनचा पाचवा टप्पा हा ११ शहरांवर केंद्रित झालेला असेल. या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई अगमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. या ११ शहरांमध्येच देशातील कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येपैकी ७० टक्के रुग्ण आहेत. तसेच यापैकी मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पुणे आणि कोलकाता या पाच शहरात मिळून देशातील कोरोनाचे ६० टक्के रुग्ण आहेत.

 लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारकडून धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागू शकते. तसेचा कुठल्याही धार्मिक स्थळी जत्रा किंवा महोत्सव यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यासही परवानगी नसेल. तसेच मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य असेल.

लॉकडाऊन ५.० दरम्यान सर्व विभागातील सलून आणि जिम उघडण्यासाठी परवानगी असेल मात्र कंटेंनमेंट झोनमध्ये अशा प्रकारची कुठलीही परवानगी दिली जाणार नाही. तसेच शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच मॉल मल्टिप्लेक्स पण बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

त्याबरोबरच लॉकडाऊन ५.० मध्ये विवाह आणि अंत्यसंस्कारामध्ये काही जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच लॉकडाऊनचा पाचवा टप्पा हा दोन आठवड्यांसाठी लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.   

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: special attention on the 11 cities in Fifth stage of lockdown BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.