शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

coronavirus : तीन महिन्यांचा EMI देऊ न शकणाऱ्यांकडून अतिरिक्त व्याज घेऊ नये, सुप्रीम कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 14:08 IST

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे कर्जदारांसमोर आर्थिक संकट उभे राहिला आहे.

ठळक मुद्देकर्जदारांना तीन EMI भरण्यासाठी सवलत देण्याची रिझर्व्ह बँकेची सूचना ज्या कर्जदारांना सध्या EMI भरण्यास अडचणी येत आहेत, त्यांच्याकडून आकारण्यात येणारे व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल नियमित हप्त्यांसोबत अतिरिक्त व्याज वसूल करणे चुकीचे

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना तीन EMI भरण्यासाठी सवलत देण्याची सूचना बँकांना केली होती. मात्र अनेक बँकांनी EMI भरण्याबाबत सशर्त सवलत देताना अतिरिक्त व्याज लागू केले आहे. दरम्यान,  ज्या कर्जदारांना सध्या EMI भरण्यास अडचणी येत आहेत, त्यांच्याकडून आकारण्यात येणारे व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

बँका आणि वित्तसंस्थानी आपल्या कर्जावर ग्राहकांकडून व्याज घेऊ नये, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या मार्च महिन्यातील सर्क्युलरमध्ये म्हटले होते. मात्र ही केवळ घोषणा आहे. कारण बँकांनी मॉरिटोरियम अवधीसाठी व्याज लागू केले आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.  

नियमित हप्त्यांसोबत अतिरिक्त व्याज वसूल करणे चुकीचे आहे. त्यामुळे संकटाच्या प्रसंगी कर्जदारांना सवलत दिली जाणे आवश्यक आहे. कर्जदारांच्या नोकऱ्यांवर संकट असताना त्यांच्याकडे पुरेसे उत्पन्न नसताना त्यांना सवलत दिली जाणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे कर्जदारांसमोर आर्थिक संकट उभे राहिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारत