Coronavirus: shopping in Australia; Crisis before Indians due to food shortage in 'desi stores' | Coronavirus : ‘कोरोना’मुळे ऑस्ट्रेलियात खरेदीला ऊत; ‘देसी स्टोअर्स’मध्ये खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे भारतीयांपुढेही संकट

Coronavirus : ‘कोरोना’मुळे ऑस्ट्रेलियात खरेदीला ऊत; ‘देसी स्टोअर्स’मध्ये खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे भारतीयांपुढेही संकट

- अंकिता देशकर

नवी दिल्ली : इतर देशांप्रमाणेच आॅस्ट्रेलियातही कोरोना विषाणू पसरला असून, लोक भीतीपोटी जीवनावश्यक वस्तूंची भरमसाट खरेदी करून ठेवत आहेत. त्यामुळे वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. ‘देसी स्टोअर्स’मधील खाद्यवस्तूंच्या तुटवड्यामुळे आॅस्ट्रेलियात राहणारे भारतीय संकटात सापडले आहेत.
ब्रिस्बेन शहरातील तुवुंग उपनगरात राहणारे भारतीय तपीश डोंगरे यांनी ‘लोकमत’शी तेथील आपले अनुभव सामायिक केले. त्यांनी सांगितले की, आॅस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स प्रांतातील कोरोनाबाधितांची संख्या ३८२ झाली आहे. काल रात्रीतून विषाणूग्रस्तांची संख्या ७५ ने वाढली आहे. व्हिक्टोरिया प्रांतात २९ नवे रुग्ण सापडल्यानंतर आकडा १५0 वर गेला आहे. तपीश यांनी सांगितले की, घाबरलेले लोक टॉयलेट पेपरसह विविध जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. त्यामुळे मॉल्समधील सर्व वस्तू संपल्या आहेत. भारतीय दुकानांतील गव्हाचे पीठ, मसाले, हळद, रवा आणि लोणचे यासारख्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
डोंगरे हे ग्रिफिथ विद्यापीठात सहाय संशोधक आहेत. सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आलेले सॅनिटायझर्स लोक चोरून घेऊन जात असून, विद्यापीठाच्या एका बैठकीत अधिकाऱ्यांत यावर गमतीशीर चर्चा झाली, असे डोंगरे यांनी सांगितले.
डोंगरे यांनी सांगितले की, येथील आरोग्यसेवा चांगल्या आहेत. विदेशी नागरिकांशी स्थानिकांची वर्तणूक चांगली आहे. वित्तीय ओझे कमी व्हावे यासाठी घरभाड्यांत १0 टक्के कपात करण्यात आली आहे. येथील शाळा-महाविद्यालये मात्र अजूनही सुरू आहेत. या साथीच्या काळात चांगले अनुभवही येत आहेत. अनेक लोक सेल्फ-आयसोलेशनसाठी मदत करीत आहेत. ज्येष्ठांना मदत करीत आहेत. खाद्य कंपन्या मोफत डिलिव्हरी किंवा किमतीत सवलत देत आहेत. तपीश यांच्या पत्नी अनुपमा ज्योती या शेफ असून, त्यांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे नोकºया गमावण्याचे संकट निर्माण झाले आहे.

- १३ आॅस्ट्रेलियन डॉलरला मिळणाºया गव्हाच्या पिठाच्या बॅगेसाठी आता २७ डॉलर मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी तर वस्तूच मिळेनाशा झाल्या आहेत. वस्तूंअभावी अनेक दुकाने लवकरच बंद होत आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींसाठी दुकाने सकाळी एक तास आधीच उघडली जात आहेत. सॅनिटायर आणि मास्क यांची तीव्र टंचाई आहे.

Web Title: Coronavirus: shopping in Australia; Crisis before Indians due to food shortage in 'desi stores'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.