शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: धडकी भरवणारी आकडेवारी, जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४० टक्के रुग्ण सापडताहेत भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 08:21 IST

तसेच भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली -कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण एकट्या भारतात सापडले आहेत. तसेच भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे.दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी देशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटून ७४ हजार ९६० झाली आहे. मात्र सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून ११२५ झाली. देशात एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत.देशात आतापर्यंत कोरोनामुळे ७२ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी भारतात तब्बल ९४ हजार रुग्ण सापडले होते. तर शनिवारीसुद्धा देशात जवळपास एवढेच रुग्ण सापडले होते. याचा अर्थ सरलेल्या आठवड्याच्या अखेरीस भारतात सुमारे १ लाख ८४ हजार नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.

वर्ल्डोमीटर संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात अमेरिकेमध्ये एकूण ७३ हजार २०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. तर ब्राझीलमध्ये हा आकडा ४५ हजार ८०२ एवढा होता. दोन्ही देशांमध्ये पूर्ण आठवड्यात सापडलेल्या नव्या रुग्णांची संख्या पाहिली तर ती १.२ लाख होते. भारतामध्ये सोमवारी ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर एकट्या महाराष्ट्रात ४२३ जणांनी कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला. हा एका दिवसामधील सर्वाधिक आकडा आहे.महाराष्ट्राचा विचार केल्यास देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये महाराष्टाची भागीदारी गेल्या आठवड्यात वाढून पहिल्यांदाच २० टक्के झाली आहे. आता राज्याची ही भागीदारी वाढून २१.७ टक्के झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ५ लाखांच्या पुढे गेला आहे. तर कर्नाटकमधील कोरोनाबाधितांची संख्याही वाढून ४ लाखांच्या पुढे गेली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य