शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Coronavirus: ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 2:21 PM

Sunderlal Bahuguna passes away: चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन झालं आहे. त्यांनी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

ऋषिकेश - चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन झालं आहे. त्यांनी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनासह अन्य आजारांमुळे ग्रस्त झाल्याने त्यांना ८ मे रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Coronavirus in India) उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पर्वतीय भागात जल, जंगल आणि जमिनीच्या प्रश्नाबाबत प्राधान्याने लढणारे आणि जनतेला त्यांचा हक्क मिळवून देणाऱ्या बहुगुणा यांचे योगदान सदैव लक्षात राहील, असे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ( Senior environmentalist leader Sunderlal Bahuguna passes away)

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये तीरथसिंह रावत म्हणाले की, चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि जगभरात वृक्षमित्र या नावाने प्रसिद्ध झालेले पर्यावरणवादी पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाची अत्यंत दु:खदायी बातमी मिळाली आहे. त्यांच्या जाण्यामुळे केवळ उत्तराखंडच नाही तर संपूर्ण देशाची हानी झाली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना १९८६ मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार आणि २००९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सत्मानित करण्यात आले होते. पर्यावरण संरक्षणाच्या मैदानामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. 

गेल्या महिन्यात उत्तराखंडमध्ये कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला होता. दरम्यान, सुंदरलाल बहुगुणा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. रुग्णालयात दाखल होण्याआधी एक आठवडाभर त्यांना ताप येत होता. देहराडूनमधील एका खासगी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत