Coronavirus : रस्त्यावर पडले होते ५००० रुपये, नोटा उचलण्यासाठी कुणीच घेईना पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 08:53 AM2020-04-29T08:53:16+5:302020-04-29T08:54:02+5:30

त्यामध्ये १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश होता. मात्र, या नोटांना हात लावायची किंवा खिशात घालायची हिंमतही कुणी केली नाही.

Coronavirus: Rs 5,000 lying on the road, no one took the initiative to pick up the note in haryana gurugram MMG | Coronavirus : रस्त्यावर पडले होते ५००० रुपये, नोटा उचलण्यासाठी कुणीच घेईना पुढाकार

Coronavirus : रस्त्यावर पडले होते ५००० रुपये, नोटा उचलण्यासाठी कुणीच घेईना पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देत्यामध्ये १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश होता. मात्र, या नोटांना हात लावायची किंवा खिशात घालायची हिंमतही कुणी केली नाही.

गुरुग्राम - जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाची दहशत आता गावापर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला सोशल मीडियावरील टिंगलटवाळीचा विषय बनलेला कोराना आता प्रत्येकजण गांभिर्याने घेत आहे. मात्र, कोरोनाबद्दल काही गैरसमज आणि अफवाही मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. त्यामुळे, नागरिकांकडून कुठलिही रिस्क घेण्यात येत नाही. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य बनला आहे. तर वर्तमानपत्र घेतानाही नागरिक विचार करताना दिसतात. त्यातच, हरयाणातील गुरुग्राम येथे चक्क रस्त्यावर पडलेल्या नोटा घेण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. कारण, प्रत्येकाच्या मनात कोरोनाची दहशत दिसून येत होती. 

गुरुग्राम जिल्ह्याच्या पटौदीतील गाव बलेवा येथे रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे गावात खळबळ माजली. बलेवा गावात चक्क रस्त्यावार ५००० रुपये पडले होते, त्यामध्ये १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश होता. मात्र, या नोटांना हात लावायची किंवा खिशात घालायची हिंमतही कुणी केली नाही. देशात असलेल्या कोरोनाच्या संकटामुळेच नागरिकांमध्ये नोटा उचलण्यासाठी भीती दिसून आली. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन या नोटा हस्तगत केल्या. 

देशात कोरानाचे संक्रमण जाणीपूर्वक पसरविण्यात येत असल्याची चर्चा आणि अफवाही पसरत आहेत. त्यामुळेच, बलेगा गावात या नोटा उचलण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. दरम्यान, पटौदी येथे कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, पटौदी येथील तीन परिसरांना कंटनेमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी या नोटा हस्तगत केल्या असून खरंच हे पैसे जाणीवपूर्वक रस्त्यावर फेकले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: Coronavirus: Rs 5,000 lying on the road, no one took the initiative to pick up the note in haryana gurugram MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.