रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का देणार; घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:18 AM2020-04-07T05:18:03+5:302020-04-07T05:18:23+5:30

टाळेबंदी उठल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू होणार असली, तरी कोरोनाची साथ अजूनही कायम आहे.

CoronaVirus Railways not giving concession to senior citizens hrb | रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का देणार; घेतला मोठा निर्णय

रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का देणार; घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील रेल्वेसेवा लॉकडाऊन संपल्यानंतर १५ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेभाड्यामध्ये देण्यात येणारी सवलत बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे.


रेल्वेच्या १५ एप्रिलनंतरच्या रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यास प्रवाशांनी याआधीच प्रारंभ केला आहे. १६ ते २० एप्रिल या कालावधीतील अनेक गाड्यांची स्लीपर, एसी वर्गातील सर्व तिकिटे आरक्षित झाली असून, प्रतीक्षायादीही जाहीर करण्यात आली आहे.


टाळेबंदी उठल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू होणार असली, तरी कोरोनाची साथ अजूनही कायम आहे. त्यामुळे लोकांनी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेगाड्यांतून विनाकारण प्रवास करणे टाळावे, असे केंद्र सरकारचे मत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेभाड्यामध्ये सवलत न देण्याचा निर्णय १५ एप्रिलपासून अमलात येणार असल्याचे कळते. आजवर रेल्वेभाड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपैकी महिलांना ५० टक्के , तर पुरुषांना ४० टक्के सवलत देण्यात येत असे.


मालवाहतूक मात्र सुरूच
२१ दिवसांची टाळेबंदी लागू होताच, रेल्वेने १३ हजाराहून अधिक गाड्यांची वाहतूक स्थगित केली. तसेच मुंबईसह अन्य ठिकाणच्या लोकल सेवाही बंद केल्या. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ््यांमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो.

 

Web Title: CoronaVirus Railways not giving concession to senior citizens hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.