coronavirus: "संकट टळलेलं नाही, देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती असेल अधिक धोकादायक"

By बाळकृष्ण परब | Published: March 1, 2021 08:47 AM2021-03-01T08:47:23+5:302021-03-01T08:53:24+5:30

coronavirus in India : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. (coronavirus) महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

coronavirus: "pandemic is not over, third wave of corona in the India will be more dangerous", Says Shekhar C Mande | coronavirus: "संकट टळलेलं नाही, देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती असेल अधिक धोकादायक"

coronavirus: "संकट टळलेलं नाही, देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती असेल अधिक धोकादायक"

Next
ठळक मुद्देकोविड-१९ चे संटक अद्याप टळलेले नाहीया साथीची तिसरी लाट आळी तर त्याचे गंभीर परिणाम होतीलभारत अद्यापही सामुहिक प्रतिकार क्षमता (हर्ड इम्युनिटी) मिळवण्यापासून दूर आहे

तिरुवनंतपुरम - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. (coronavirus) महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाची नवी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान भारतात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर ती प्रत्यक्षात भीती व्यक्त करण्यात येत आहे, त्यापेक्षा अधिक धोकादायक असेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सीएसआयआरचे महासंचालक शेखर सी. मांडे (Shekhar C Mande) यांनी याबाबतचा इशारा दिला आहे. ( "pandemic is not over, third wave of corona in the India will be more dangerous")

कोविड-१९ चे संटक अद्याप टळलेले नाही. जर या साथीची तिसरी लाट आळी तर त्याचे गंभीर परिणाम होतील,मांडे यांनी तिरुवनंतपुरममध्ये राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे विधान केले. कोविड-१९ आणि भारताच्या उपाययोजना हा या कार्यक्रमाचा विषय होता.  
यावेळी मांडे यांनी सांगितले की, भारत अद्यापही सामुहिक प्रतिकार क्षमता (हर्ड इम्युनिटी) मिळवण्यापासून दूर आहे. अशा परिस्थितीत विषाणू आणि संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. त्याशिवाय नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग तसेच हातांच्या स्वच्छतेसारख्या उपायांचाही अवलंब केला पाहिजे. 

दरम्यान, कोरोनाच्या फैलावाची तीव्रता कमी होत असल्याने काहीशा निश्चिंत झालेल्या लोकांना आणि तज्ज्ञांनाही मांडे यांनी इशारा दिला आहे. जर कोरोनाची तिसरी लाट आली तर देशाने आतापर्यंत सामना केलेल्या परिस्थितीपेक्षा गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.  

आरजीसीबीचे संचालक चंद्रभास नारायण यांनी डिजिटल कार्यक्रमाचे संचालन केले. मांडे यांनी यावेळी तज्ज्ञांच्या प्रश्नांची उत्तरे देताना कोविड-१९ वरील लस कोरोना विषाणूच्या विविध रूपांविरोधात प्रभावी असेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.  

Web Title: coronavirus: "pandemic is not over, third wave of corona in the India will be more dangerous", Says Shekhar C Mande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.