coronavirus numbers given by UP cm Yogi Adityanath suggests government hiding data | Coronavirus News: उत्तर प्रदेशात कोरोनाचे तब्बल १० लाख रुग्ण?; स्वत:च दिलेल्या आकडेवारीमुळे फसले योगी

Coronavirus News: उत्तर प्रदेशात कोरोनाचे तब्बल १० लाख रुग्ण?; स्वत:च दिलेल्या आकडेवारीमुळे फसले योगी

लखनऊ: देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य असूनही उत्तर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या अतिशय नियंत्रणात असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांमधील राज्यांचा विचार केल्यास उत्तर प्रदेश पहिल्या पाच राज्यांमध्येही येत नाही. मात्र उत्तर प्रदेश सरकार देत असलेला खोटा आहे की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनीच दिलेल्या आकडेवारीत अडकले आहेत. मुंबईहून परतलेले ७५ टक्के, तर दिल्लीहून परतलेले ५० टक्के मजूर कोरोनाबाधित असल्याचं विधान योगींनी केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार कोरोनाबाधितांची आकडेवारी लपवतंय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई, दिल्लीहून परतलेल्या अनेक मजुरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतर राज्यांमधून परतलेल्या मजुरांमधील २५ ते ३० टक्के जण कोरोनाबाधित असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. आदित्यनाथ यांनी सांगितलेल्या आकडेवारीचा विचार केल्यास उत्तर प्रदेश सरकार प्रसिद्ध करत असलेल्या रुग्णांच्या संख्येवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय कमी आहे. सरकारचे प्रमुख आरोग्य सचिव अमित सोहन प्रसाद यांनी आज राज्यातील कोरोना रुग्णांची माहिती दिली. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ३५२ असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मुंबई, दिल्लीसह इतर राज्यांमधून लाखो मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. मुंबईतून परतलेल्या ७५ टक्के, दिल्लीतून परतलेल्या ५० टक्के, तर इतर राज्यांमधून परतलेल्या २५ ते ३० टक्के मजुरांना कोरोनाची लागण झाल्याचं खुद्द योगी आदित्यनाथ सांगत आहेत. असं असताना प्रशासनाकडून दिला जाणारा आकडा इतका कमी कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

योगी आदित्यनाथ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनी काही सवाल विचारले आहेत. 'मुख्यमंत्री योगी यांनी सांगितलेला आकडा नेमका आला कुठून? त्याला आधार काय? परतलेल्या प्रवाशांमधील कोरोना रुग्णांची टक्केवारी कुठून आली? उत्तर प्रदेशात १० लाख कोरोना रुग्ण आहेत, असं योगींना सांगायचं आहे का? मग त्यांचंच सरकार केवळ ६ हजार २०० आकडा कसा काय सांगतं?', अशा प्रश्नांची सरबत्तीच गांधींनी केली आहे.

VIDEO: पाकिस्तानातून आलेलं 'ते' संकट महाराष्ट्रात; कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

अडकलेल्या मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला गब्बरचा सलाम

राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus numbers given by UP cm Yogi Adityanath suggests government hiding data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.