CoronaVirus: महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये लॉकडाऊनचा अपेक्षित परिणाम नाही? पाहा काय सांगते आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:09 IST2020-04-24T04:17:42+5:302020-04-24T07:09:01+5:30
दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात रुग्णांमध्ये वाढ; आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली

CoronaVirus: महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये लॉकडाऊनचा अपेक्षित परिणाम नाही? पाहा काय सांगते आकडेवारी
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या पाचव्या आठवड्यानंतरही कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख रोखण्यात महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील सहा राज्यांना अपयश आले आहे. या सर्व राज्यांमधील स्थिती चिंताजनक असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम अजूनच कठोर केले जातील.
केंद्रीय गृह मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाढीचा वेग कमी न झाल्यास या सर्व राज्यांमधील काही शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्या दिवशी महाराष्ट्रात १२८ रुग्ण होते. पाचव्या आठवड्यात २२ एप्रिलपर्यंत हा आकडा ५२२१ वर पोहोचल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली. पंतप्रधानांच्या गृहराज्यात गुजरातमध्ये पहिला व दुसरा आठवडा काहीसा दिलासा देणारा होता मात्र तिसऱ्या आठवड्यापासून तेथेही स्थिती बिकट झाली. दिल्लीतही हीच स्थिती आहे. दिल्लीत २५ मार्चला ३१ रूग्ण होते. महिनाभरानंतर हा आकडा २१५६ वर पोहोचला.
राज्य २५ मार्च १ एप्रिल ८ एप्रिल १५ एप्रिल २२ एप्रिल
महाराष्ट्र १२८ ३०२ १०१८ २६८७ ५२२१
गुजरात ३८ ८२ १६५ ६९५ २२७२
दिल्ली ३१ १५२ ५७६ १५६१ २१५६
राजस्थान ३६ ९३ ३२८ १००५ १८०१
तामिळनाडू १८ २३४ ६०९ १२०४ १५९६
मध्यप्रदेश १४ ६६ २२९ ९८७ १५९२
(स्त्रोत - केंद्रीय आरोग्य मंत्रालय)