CoronaVirus : खरच, हवा आणि प्राण्यांपासून कोरोना पसरतो...? सरकारनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 07:46 PM2021-05-05T19:46:40+5:302021-05-05T19:47:27+5:30

एवढी भीषण आणि दीर्घ कोरोना लाट, जिचा आपण सामना करत आहोत. तिच्याबाबतीत पूर्वानुमान लावण्यात आला नव्हता. कोरोना हवेतून पसरत नाही, असे विजय राघवन यांनी म्हटले आहे.

CoronaVirus NITI aayog member dr vk paul says coronavirus is not spreading through animals | CoronaVirus : खरच, हवा आणि प्राण्यांपासून कोरोना पसरतो...? सरकारनं दिलं उत्तर

CoronaVirus : खरच, हवा आणि प्राण्यांपासून कोरोना पसरतो...? सरकारनं दिलं उत्तर

Next

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार, मात्र, ती नेमकी केव्हा येणार आणि कशा स्वरुपाची असेल, हे सांगणे सध्या कठीण आहे. त्यासाठी आपल्याला तयार राहायला हवे, असे केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी म्हटले आहे. (CoronaVirus NITI aayog member dr vk paul says coronavirus is not spreading through animals)

एवढेच नाही, तर एवढी भीषण आणि दीर्घ कोरोना लाट, जिचा आपण सामना करत आहोत. तिच्याबाबतीत पूर्वानुमान लावण्यात आला नव्हता, असेही विजय राघवन म्हणाले. याच बरोबर कोरोना हवेतून पसरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे, की कोरोना हा आजार प्राण्यांपासून पसरत नाहीय, तर हे मानसांतून-मानसांतील ट्रान्समिशन आहे. 

कोरोनाचा कहर वाढणार -
येणाऱ्या काही दिवसांत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढू शकतो. सध्याच्या तुलनेत मृतांची संख्या दुप्पटीने वाढू शकते, असा अंदाज बेंगळुरूतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने वर्तवला आहे. कोरोनाचे सध्याचे आकडे विचारात घेऊन गणिती प्रारुपाच्या आधारे त्याचे विश्लेषण करून या टीमने हा अंदाज वर्तवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिल्यास 11 जूनपर्यंत भारतात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा 4 लाख 4 हजारपर्यंत असेल, अशी शक्यता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या टीमने वर्तवली आहे.

जुलै अखेरपर्यंत भारतात कोरोनामुळे 10 लाख 18 हजार 879 जणांचा मृत्यू होईल, असा अंदाज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटचे वर्तवला आहे. भारतासारख्या देशात कोरोनासंदर्भात कोणताही अंदाज बांधणे अवघड आहे. कोरोना संकटात सोशल डिस्टन्सिंग, टेस्टिंग योग्य पद्धतीने झाल्यास बराच फरक पडतो. भारतात सध्याच्या घडीला अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत, असेही हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus NITI aayog member dr vk paul says coronavirus is not spreading through animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app