Corona Vaccination: २०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:28 PM2021-06-10T15:28:10+5:302021-06-10T15:33:25+5:30

CoronaVirus News: कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्याचा पराक्रम; लस घेतलेल्या रुग्णाला नाहक मनस्ताप

CoronaVirus news Wrong Date Of Covid Vaccination On Health Department Card In uttar pradesh | Corona Vaccination: २०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्ये

Corona Vaccination: २०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्ये

Next

हाथरस: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होऊ लागल्यानं दिलासादालक स्थिती आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र काही ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागत आहे. तर कुठे लसीकरणावेळी गोंधळ पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये लसीकरण प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराचा फटका एका तरुणाला बसला आहे.

अहो आश्चर्यम! लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू

हाथरसमध्ये राहणारा एक तरुण कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याला काही तास वाट पाहावी लागली. त्यानंतर त्याला पावती मिळाली. थोड्या वेळानं लस टोचण्यात आली. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याला एक कार्ड देण्यात आलं. घरी गेल्यावर त्यानं ते कार्ड वाचलं. कार्डवरील तारीख पाहून त्याला धक्काच बसला. कारण पहिली लस जून २०२१ मध्ये नव्हे, तर सप्टेंबर २०१६ मध्ये दिली गेल्याचा उल्लेख कार्डवर होता.

धोका वाढला! कोरोनानंतर 'हा' आजार तयार करतोय लंग बॉल, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणं 

हाथरसमधील सासनी येथे राहणारा प्रशांत कुमार दीक्षित नावाचा तरुण ७ जूनला जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी गेला होता. तिथे बरीच मोठी रांग असल्यानं प्रशांतला काही तास त्याला वाट पाहावी लागली. पावती तयार करणाऱ्या व्यक्तीनं ७ सप्टेंबर २०१६ तारीख लिहिली. त्याकडे फार्मासिस्टनं दुर्लक्ष करून नोंदणी करून लसीचा डोस दिला. ही बाब घरी पोहोचल्यानंतर प्रशांतच्या लक्षात आली. त्यामुळे तो मानसिक त्रास झाला. 

दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन
प्रशांत दीक्षित लस घ्यायला आले तेव्हा बरीच गर्दी होती. कामाचा जास्त ताण असल्यानं कर्मचाऱ्यानं कार्डवर चुकीची तारीख लिहिली असावी, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न सीएचसी सासनीचे डॉ. एस. पी. सिंह यांनी केला. त्या दिवशी ज्यांचं लसीकरण झालं, त्यांना बोलावण्यात येईल आणि तारीख दुरुस्त करून देण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

Web Title: CoronaVirus news Wrong Date Of Covid Vaccination On Health Department Card In uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.