निलंबित डॉक्टरला बेड्या घालून पोलिसांची मारहाण, आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:28 AM2020-05-18T01:28:04+5:302020-05-18T07:02:19+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोना रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेल्या एन-९५ प्रकारच्या मास्कची आंध्र प्रदेशमधील रुग्णालयात कमतरता आहे.

CoronaVirus News : Suspended doctor handcuffed, beaten by police, shocking incident in Andhra Pradesh | निलंबित डॉक्टरला बेड्या घालून पोलिसांची मारहाण, आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

निलंबित डॉक्टरला बेड्या घालून पोलिसांची मारहाण, आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

Next

हैदराबाद : आंध्र प्रदेशात निलंबित केलेल्या एका डॉक्टरला विशाखापट्टणम पोलिसांनी बेड्या घालून रस्त्यावरून फरपटत नेले तसेच त्याला बेदम मारहाण केल्याचा अतिशय संतापजनक प्रकार नुकताच घडला आहे. या डॉक्टरला अमानुष वागणूक देणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेल्या एन-९५ प्रकारच्या मास्कची आंध्र प्रदेशमधील रुग्णालयात कमतरता आहे. हे सत्य जगासमोर आणल्याने राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या डॉ. सुधाकर यांना पोलिसांनी ही पाशवी वागणूक दिली आहे. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत झळकताच खळबळ माजली.
डॉ. सुधाकर यांना विशाखापट्टणमचे पोलीस अमानुष पद्धतीने वागवत असताना, असंख्य लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. या डॉक्टरच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या व त्यांना रस्त्यावरून फरफटत रिक्षापर्यंत आणले. मग त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
कोरोना रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना सरकारी यंत्रणा एन-९५ मास्क देत नसल्याचा व एक मास्क पंधरा दिवसांपर्यंत वापरण्यास सांगितले जात असल्याचा आरोप डॉ. सुधाकर यांनी मार्च महिन्यात केला होता. त्यानंतर त्यांच्यावर राज्याच्या आरोग्य खात्याने निलंबनाची कारवाई केली. डॉ. सुधाकर खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आंध्र प्रदेश सरकारने केला होता. या डॉक्टरला अमानुष पद्धतीने वागविणाºया पोलीस शिपायाला तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त आर. के. मीना यांनी दिली आहे. डॉ. सुधाकर यांच्याशी पोलीस अमानुष पद्धतीने वागल्याबद्दल विरोधी पक्ष तसेच नेटिझनने जोरदार टीका केली आहे. तेलगू देसम, भाकप व अन्य पक्षांनी पोलिसांचा निषेध केला आहे.


पोलीस आयुक्त काय म्हणाले?
- विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त आर. के. मीना यांनी असा दावा केला की, या शहरातील अक्कयापालेम भागामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एक माणूस अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली.
- ती व्यक्ती म्हणजे डॉ. सुधाकर होते. त्यांना काबूत आणण्याचा प्रयत्न केला असता ते पोलिसांशी अतिशय वाईट पद्धतीने वागले. त्यांनी पोलीस शिपायाचा मोबाईल फेकून दिला. डॉ. सुधाकर हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत, असे मीना म्हणाले.

Web Title: CoronaVirus News : Suspended doctor handcuffed, beaten by police, shocking incident in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.