CoronaVirus News: रशियाहून भारतासाठी शुभवार्ता; कोरोनावर 'या' औषधाचा वापर करण्यास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 11:42 IST2020-06-13T11:28:21+5:302020-06-13T11:42:09+5:30
फेविपिराविरचे भारतातील उत्पादन मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीतर्फे केले जाते.

CoronaVirus News: रशियाहून भारतासाठी शुभवार्ता; कोरोनावर 'या' औषधाचा वापर करण्यास मान्यता
नवी दिल्ली : फेविपिराविर या घटकापासून बनविलेल्या एव्हिफेविर या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापर करण्यास रशियानेही दिलेली संमती ही भारतासाठी देखील चांगली बातमी आहे. इन्फ्लुएंझा तापावर देण्यात येणारे फेविपिराविर कोरोनावर प्रतिबंधक औषध म्हणूनही उपयोगी ठरेल का हे तपासण्याकरिता भारतातही माणसांवर चाचण्या सुरू आहेत. एव्हिफे विर हे कोरोना आजारावर अत्यंत परिणामकारक औषध ठरू शकेल असा विश्वास या औषधाच्या रशियातील उत्पादकांनी व्यक्त केला आहे.
फेविपिराविरचे भारतातील उत्पादन मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीतर्फे केले जाते. रशियामध्ये एव्हिफेविर हे औषध कोरोना रुग्णांना दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेन्ट फंड (आरडीआयएफ) या संस्थेने सांगितले की, रशियातील रुग्णालयांमध्ये जून महिन्यात एव्हिफेविर औषध अनेक रुग्णांना देण्यात येईल. या औषधाचे त्यांच्यावरील परिणामही अभ्यासण्यात येतील. एव्हिफेविर व फेविपिराविर यांच्यात साम्य असल्याने रशियात माणसांवर सुरू असलेल्या प्रयोगांतील निष्कर्षांचा भारतालाही खूप फायदा होणार आहे.
फेविपिराविरबद्दल संशोधकांना आशा
सिलिगुडी येथील नॉर्थ बेंगॉल मेडिकल कॉलेजचे संशोधक अरुपकुमार बॅनर्जी यांनी सांगितले की, फेविपिराविर हे औषध परिणामकारक ठरेल असे भारतातील काही संशोधकांचे मत आहे. या औषधाच्या गुणधर्माविषयी नेहमी भारतातल्या वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू असते. फेविपिराविर हे औषध एव्हिगन नावाने जपानमध्येही उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; मनसेने दिला इशारा
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ