CoronaVirus News: देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड लाखांवर; १६ हजार नवे रुग्ण, १३८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 06:56 IST2021-02-26T00:32:03+5:302021-02-26T06:56:07+5:30
२९ जानेवारी रोजी एका दिवसात १८,८५५ नवे रुग्ण सापडले होते.

CoronaVirus News: देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड लाखांवर; १६ हजार नवे रुग्ण, १३८ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून गुरुवारी १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले व १३८ जण मरण पावले. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी १० लाखांहून अधिक झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड लाखांवर पोहोचली आहे.
२९ जानेवारी रोजी एका दिवसात १८,८५५ नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर गुरुवारी सर्वाधिक १६७३८ नवे रुग्ण सापडले. तसेच २६ दिवसांनंतर बळींची एका दिवसातील संख्या १३०वर गेली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख ५६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाच्या आजारातून १ कोटी ७ लाख ३८ हजार जण बरे झाले आहेत.