शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

CoronaVirus News : मास्क व ट्रिपल-टी उपायाने कोरोना लाट रोखणे शक्य, आरोग्य सचिव राजेश भूषण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 4:01 AM

CoronaVirus News: नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, देशात लसीकरण उत्सव साजरा होत आहे. देशात जवळपास ७१ हज़ार लसीकरण केंद्रांवर काम केले जात आहे.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काळजी व्यक्त करताना आम्ही या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू, असे म्हटले. कोरोनाच्या या संघर्षात लोकांनी मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे, याशिवाय राज्यांनी चाचण्या, रुग्ण शोधणे आणि उपचारांसोबत कंटेनमेंट झोन बनवून कोविड-१९ अनुकूल वर्तनाबाबत जागरूकता केल्यास परिस्थितीत निश्चितच सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.भूषण म्हणाले की, देशात लसीची टंचाई नाही. मोठ्या राज्यांना चार दिवस पुरेल एवढ्या लसीचा बॅकअप देऊन पुरवठा केला जातो. भूषण म्हणाले की, ८९.५१ टक्के लोक कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. एकूण नऊ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. ५३ जिल्ह्यांत केंद्रांची पथके जिल्हा प्रशासनासोबत काम करीत आहेत. जगात सर्वात जास्त लस भारतात दिली जात आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, केरळ, कर्नाटक राज्यांची आकडेवारी देऊन म्हटले की, या राज्यांत आरटीपीसीआर चाचण्या चाचण्या वाढवण्याचीही गरज आहे. त्यातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्या, रुग्ण शोधणे आणि उपचार धोेरणावर योग्यरीत्या काम होऊ शकेल, असे ते म्हणाले.नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, देशात लसीकरण उत्सव साजरा होत आहे. देशात जवळपास ७१ हज़ार लसीकरण केंद्रांवर काम केले जात आहे. भारताला स्पुटनिक ही तिसरी लस मिळाली आहे. स्पुटनिकची चाचणी ३० हज़ार लोकांवर झाली आहे. कोरोना महामारीत जर कोणत्याही लसीला अमेरिका, जपान किंवा युरोपीय संघाच्या नियामकांकडून किंवा रेग्युलेटर्स किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली असेल तर तिला भारतात ट्रायलची गरज नाही. फक्त सात दिवस तिच्या परिणामांवर लक्ष ठेवले जाईल. जॉन्सन, फ्राइज़र, मॉडर्नालाही भारतात येण्याचे निमंत्रण दिले गेले आहे, असे पॉल म्हणाले.

रेमडेसिविरची टंचाई नाहीपॉल म्हणाले, ‘‘ रेमडेसिविरचा अभ्यास केला गेला. तिचा वापर घरी किंवा कमी लक्षण असल्यावर केला जाऊ नये. व्यक्तीच्या शरीरात प्राणवायुची कमी आणि डॉक्टरांचा सल्ला असल्यावरच तिचा वापर केला पाहिजे. देशात रेमडेसिविरची टंचाई नाही. लोकांनी टंचाई आहे असा प्रचार करू नये. जर सगळ्यांनी मास्क वापरला तर कोरोनाची लाट रोखता येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या