शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CoronaVirus News : लॉकडाऊनच्या काळातही जामियाच्या विद्यार्थ्याला मिळाली ४१ लाखांच्या नोकरीची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 13:19 IST

प्रथम बत्रा या नावाच्या विद्यार्थ्याला वर्षाकाठी 41 लाख रुपयांच्या ऑफरचं पॅकेज मिळालं आहे.

ठळक मुद्दे देशात कोरोना विषाणूसारख्या साथीच्या रोगानं हाहाकार माजवला असतानाच एक चांगली बातमीही समोर आली आहे. जामियामध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला 41 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. प्रथम बत्रा या नावाच्या विद्यार्थ्याला वर्षाकाठी 41 लाख रुपयांच्या ऑफरचं पॅकेज मिळालं आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोना विषाणूसारख्या साथीच्या रोगानं हाहाकार माजवला असतानाच एक चांगली बातमीही समोर आली आहे. जामियामध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला 41 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. जामियामध्ये सध्या प्लेसमेंट्स सुरू असून, कोरोना लॉकडाऊन होण्यापूर्वीच सुरू झाले होते. सध्या ते ऑनलाइन सुरू आहे. प्रथम बत्रा या नावाच्या विद्यार्थ्याला वर्षाकाठी 41 लाख रुपयांच्या ऑफरचं पॅकेज मिळालं आहे.प्रथम बत्रा जामिया येथून बीटेक करत होता. मायक्रोसॉफ्ट इंडियाने त्याला ही ऑफर दिली आहे. प्रथम बत्रा हा गाझियाबादमधील नेहरू नगर येथे राहतो. जामियाच्या अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यासक्रमातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे. बत्राने 12वीच्या वर्गात 90.4 टक्के गुण मिळवले होते.257 जणांना आतापर्यंत नोकरीच्या ऑफर आल्या जामिया युनिव्हर्सिटी प्लेसमेंट सेलने कोरोनाच्या आधी शेवटच्या सत्रात प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात केली होती, ज्यामध्ये 52 कंपन्यांनी विविध पदव्युत्तर, पदवीधर आणि पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना 257 नोकरीच्या संधी दिल्या आहेत. बीटेकच्या प्रथम बत्रा नावाच्या विद्यार्थ्याला मायक्रोसोफ्ट इंडियाने 41 लाख रुपये वार्षिक वेतनाची प्री-प्लेसमेंटची ऑफर दिली आहे आणि बीटेकची विद्यार्थी आभा अग्रवाल याला दरमहा 80000 रुपये वेतन असणारी इंटर्नशिप देण्यात आली आहे. सध्या जामिया मिलिया इस्लामियाचे  कुलगुरू प्रा. नझ्मा अख्तरने त्यांच्या प्लेसमेंट सेलला ऑनलाइन प्लेसमेंट ड्राईव्हसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. ऑनलाइन शिक्षणाद्वारे विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना तयार केले आहे. असे केल्याने जामिया देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये सामील झाली आहे.कोणत्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळू शकतेजामियाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अजीम म्हणाले, 'जामियाच्या विद्यार्थ्यांना नोकरी देणा-या कंपन्यांमध्ये सॅमसंग आर अँड डी, सिमेंस, महिंद्रा कॉमविवा, वेदांता लिमिटेड, एनआयआयटी, एल अँड टी लिमिटेड, अमेरिकन एक्सप्रेस, विप्रो टेक्नोलॉजीज, आयबीएम, एल अँड टी कन्स्ट्रक्शन, इनोव्हेटर, टीएफटी, स्प्रिंगबोर्ड, न्यूजेन टेक्नॉलॉजीज, जिया सेमीकंडक्टर, टीसीएस, ओवायओ, एव्हीझेडव्हीए, फुजीत्सु सल्ला एनजी, जेल कन्सल्टिंग, अझीम प्रेमजी फाऊंडेशन, सेरिट, टीव्ही 9, सियानाइफ ग्रुप, ऑप्टॉम युनायटेड हेल्थ ग्रुप इत्यादी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

CoronaVirus News: मोठं यश! भारताने 'फेलुदा' स्ट्रिप केली विकसित; आता काही मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

टॅग्स :jobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या