CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:47 AM2020-05-13T10:47:52+5:302020-05-13T10:52:20+5:30

आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

lockdown pm narendra modi economic relief package p chidambaram vrd | CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करून कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात देशवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले की, काल पंतप्रधानांनी एक हेडलाइन आणि एक कोरा कागद दिला, जो आज अर्थमंत्री भरणार आहेत. आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करून कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात देशवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पण या निर्णयावरही काँग्रेसनं टीका केली आहे.  हा निर्णय उशिरा झाल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले की, काल पंतप्रधानांनी एक हेडलाइन आणि एक कोरा कागद दिला, जो आज अर्थमंत्री भरणार आहेत. आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 
पी. चिदंबरम यांनी बुधवारी एक ट्विट करत सरकारच्या पॅकेजवर टीका केली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, 'काल पंतप्रधानांनी आम्हाला एक मथळा आणि कोरा कागद दिला. साहजिकच माझी प्रतिक्रिया देखील कोरी होती. आज आम्ही अर्थमंत्र्यांकडून भरण्यात येणाऱ्या कोऱ्या कागदावर नजर ठेवून आहोत. सरकार खरंच अर्थव्यवस्थेत सुधारणा करत आहे की नाही हे याकडे आम्ही काळजीपूर्वक लक्ष्य देऊ.


माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, 'कोणाला काय मिळते, याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करू. गरीब, भुकेलेले आणि उद्ध्वस्त झालेल्या परप्रांतीय कामगारांना शेकडो किलोमीटर चालून आपल्या घरी पोहोचल्यावर काय मिळणार आहे ते आम्ही पाहणार आहोत. तसेच खालच्या वर्गातील लोकांना (13 कोटी कुटुंबांना) खरंच काय मिळणार?, यावरही आमचं लक्ष आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: मोठं यश! भारताने 'फेलुदा' स्ट्रिप केली विकसित; आता काही मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

धक्कादायक! कोरोना संक्रमित जवानानं रुग्णालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

Read in English

Web Title: lockdown pm narendra modi economic relief package p chidambaram vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.