CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 11:26 AM2020-05-13T11:26:47+5:302020-05-13T11:38:05+5:30

भारतानं चीनचा वन चायना प्रिन्सिपल(वन चीन सिद्धांत) लक्षात ठेवावा.

taiwan seeks help from india to attend wha meeting china vrd | CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला

CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला

Next
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत जात असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.चीन सातत्याने तैवान आपल्या देशाचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत आला आहे. तैवाननं 'वर्ल्ड हेल्थ असेंब्ली' (डब्ल्यूएचए)मध्ये सहभागी होण्यासाठी भारताकडे मदत मागितली.

बीजिंगः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत जात असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या कोरोनाच्या संकटातही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. चीन सातत्याने तैवान आपल्या देशाचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत आला आहे. तैवाननं 'वर्ल्ड हेल्थ असेंब्ली' (डब्ल्यूएचए)मध्ये सहभागी होण्यासाठी भारताकडे मदत मागितली, त्यावर भारतातल्या चिनी राजदूतानं लागलीच प्रतिक्रिया दिली आहे. भारतानं चीनचा वन चायना प्रिन्सिपल(वन चीन सिद्धांत) लक्षात ठेवावा.

चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेसह डब्ल्यूएचओसह सर्व कामांमध्ये तैवान प्रदेशाच्या सहभागाबाबत चीनची भूमिका स्पष्ट आहे. हे प्रकरण वन चायना प्रिन्सिपल तत्त्वानुसार हाताळले पाहिजे. तैवान हा चीनचाच अविभाज्य भाग आहे. वन चीन सिद्धांतानुसार, चिनी सरकारने जागतिक आरोग्याविषयक बाबींमध्ये तैवानच्या देशाच्या सहभागासाठी योग्य ती व्यवस्था केलेली आहे, ज्यामुळे हे सुनिश्चित होते की या क्षेत्राला स्थानिक किंवा जागतिक सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीतून वेळेवर आणि प्रभावी पद्धतीनं मदत मिळत राहील.

कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यात तैवानला अभूतपूर्व यश मिळाले. भारताशी औपचारिक संबंध नसतानाही त्यांनी गेल्या आठवड्यात 10 लाख सर्जिकल मास्क दान केले. राजनैतिक सूत्रांनी सांगितले की, ही देणगी डब्ल्यूएचओच्या बैठकीस उपस्थित राहण्याच्या प्रयत्नांसाठी भारताकडून पाठिंबा मिळण्यासाठी करण्यात आली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

CoronaVirus News: मोठं यश! भारताने 'फेलुदा' स्ट्रिप केली विकसित; आता काही मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

धक्कादायक! कोरोना संक्रमित जवानानं रुग्णालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

Web Title: taiwan seeks help from india to attend wha meeting china vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन