CoronaVirus News: हायड्रॉक्सीक्लोरोक्विन प्रतिबंधक औषधास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 06:33 IST2020-05-23T23:40:21+5:302020-05-24T06:33:56+5:30
औषधाच्या वापराबद्दल आरोग्य खात्याने याआधी २३ मार्चलाही एक पत्रक जारी केले होते.

CoronaVirus News: हायड्रॉक्सीक्लोरोक्विन प्रतिबंधक औषधास मंजुरी
नवी दिल्ली : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोना आजार बरा करण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे अजून सिद्ध झालेले नाही, असे लँसेट या जगप्रसिद्ध नियतकालिकाने नुकतेच म्हटले होते. असे असूनही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मोठ्या समूहाला प्रतिबंधात्मक औषध म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्यास केंद्रीय आरोग्य खात्याने मंजुरी दिली आहे.
यासंदर्भातील पत्रकात आरोग्य खात्याने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांवर उपचार करणारे व या आजाराच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या आरोग्यसेवकांना, कोरोना रुग्णांशी संबंधित कार्यामध्ये मदत करणारे, गस्त घालणारे पोलीस, निमलष्करी दलाचे जवान यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध म्हणून देण्यात यावे.
या औषधाच्या वापराबद्दल आरोग्य खात्याने याआधी २३ मार्चलाही एक पत्रक जारी केले होते. यासंदर्भात इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या एका पदाधिकाºयाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध उपयोगी ठरत असल्याचे भारतातील प्रयोगांतून आढळून आले आहे. त्यामुळे त्याचा प्रतिबंधक औषध म्हणून वापर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी
दिली आहे.
संसर्ग झालेल्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिल्यानंतर तो आजार बरा होतो की नाही याचे ठोस निष्कर्ष हाती आले नसल्याने अशा रुग्णांना हे औषध देऊ नये, असे लॅन्सेट नियतकालिकाच्या लेखात म्हटले आहे. केंद्र सरकारने दिलेली मंजुरी व लॅन्सेटमधील लेखाचा आशय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.