शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

CoronaVirus News: कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यावर किती वेळात होते लागण?; वाचून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 7:57 AM

CoronaVirus News: कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरतोय; संक्रमणाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणदेखील वाढलं आहे. दिल्लीत तर कोरोनानं अक्षरश: कहर केला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे १७ हजार २८२ नवे रुग्ण आढळून आले. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हिटीचं प्रमाण १५.९२ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १०४ इतकी आहे.भारतात ४ ते ६ परदेशी कोरोना लसी येणार; जाणून घ्या किंमत किती असणारमास्क न लावल्यास कोरोना होण्याचा धोकागेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. मात्र आता आलेली दुसरी लाट अधिक भीषण आहे. आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण व्हायची. आता हेच प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. कोरोना फैलावण्याचा वेगदेखील वाढला आहे. मास्क न घालता कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास अवघ्या मिनिटभरात तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढण्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे. याआधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी कोरोना होण्याचा धोका असायचा. आता ही वेळ मिनिटावर आली आहे. लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोलबीएलके सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्वसनतज्ज्ञ डॉ. संजीव नय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू अतिशय वेगानं हातपाय पसरत आहे. आधीच्या तुलनेत त्याच्या फैलावाचा वेग वाढला आहे. आधी परिस्थिती वेगळी होती. एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी तिला कोरोना होण्याचा धोका होता. पण आता एका मिनिटातच कोरोनाची लागण होत आहे. दिल्लीतील सर्वाधिक कोरोना रुग्ण ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. या वयोगटातली लोकसंख्या जास्त असल्यानं आणि ते कामासाठी बाहेर पडत असल्यानं रुग्णांमध्ये त्यांचं प्रमाण लक्षणीय आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या