शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुळे आयसीयूमध्ये सर्वाधिक मृत्यू कोणाचे? धक्कादायक आकडेवारी पाहून एम्सचे डॉक्टरही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:03 IST

CoronaVirus News: कोरोनामुळे आयसीयूमध्ये सर्वाधिक मृत्यू कोणत्या वयोगटातील लोकांचे झाले याची आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली: कोरोना झाल्यामुळे एम्समध्ये दाखल झालेल्या आणि आयसीयूमध्ये मृत पावलेल्यांमध्ये ५० पेक्षा कमी वय असलेल्यांचं प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. एम्सच्या आयसीयूमध्ये ज्येष्ठ नागरिकांपेक्षा तरुण जास्त प्रमाणात मृत्यूमुखी पडले आहेत. एम्सच्या अभ्यासातून ही चक्रावून टाकणारी बाब समोर आली आहे. एम्सच्या आयसीयूमध्ये कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या २२७ इतकी आहे. त्यातील ४२.१ टक्के रुग्ण १८ ते ५० वर्षे इतकी आहे. घाईघाईने निर्बंध उठवून धोका पत्करू नका; सात जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

एम्सच्या आयसीयूमध्ये शेवटचा श्वास घेतलेल्या ९४.७४ टक्के रुग्णांना एक किंवा एकापेक्षा अधिक गंभीर आजार होते. एम्सनं केलेल्या अभ्यासात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या एकूण संख्येत ५० वर्षांखालील व्यक्तींचं प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती पुढे आली. '५० वर्षांखालील व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराची समस्या असते. त्यांना असलेल्या गंभीर आजारामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो,' असं तज्ज्ञांनी सांगितलं.बनावट लसीकरणातून २ हजार जणांची फसवणूक; हायकोर्टाला दिली माहिती, मुंबईतील प्रकार

एम्समध्ये ४ एप्रिल ते २४ जुलै या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. एम्सच्या आयसीयूमध्ये एकूण ६५४ रुग्ण दाखल झाले होते. यातील २२७ जणांचा मृत्यू झाला. यातील ६५ टक्के पुरुष होते. मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं सरासरी ५६ इतकं होतं. मात्र १८ वर्षांच्या एका रुग्णाचादेखील मृत्यू झाला. तर ९७ वर्षांचा एका व्यक्तीचाही कोरोनामुळे जीव गेला. 

'मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. ही बाब चक्रावून टाकणारी आहे. एकूण मृत्यूंची संख्या पाहिल्यास ४२.१ टक्के मृत्यू १८ ते ५० वयोगटातील आहेत. तर ३४.८ टक्के मृत्यू ५१ ते ६५ वयोगटातील आहेत. तर २३.१ टक्के मृत्यू ६५ च्या पुढील वयोगटातील आहेत,' अशी माहिती एम्सच्या ट्रॉमा केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या