CoronaVirus News : चहा प्यायला थेट रुग्णालयातून बाहेर पडला कोरोना पॉझिटिव्ह अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:12 PM2020-07-03T14:12:09+5:302020-07-03T14:13:01+5:30

अशातच बंगळुरूतील चहाचा शौकीन असलेल्या एका कोरोना रुग्णानं थेट रुग्णालयाच्या बाहेर धाव घेतली.

CoronaVirus News : corona patient steps out from hospital for a cup of tea in bangalore | CoronaVirus News : चहा प्यायला थेट रुग्णालयातून बाहेर पडला कोरोना पॉझिटिव्ह अन् झालं असं काही...

CoronaVirus News : चहा प्यायला थेट रुग्णालयातून बाहेर पडला कोरोना पॉझिटिव्ह अन् झालं असं काही...

Next

बंगळुरूः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णालयातही रुग्णांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष असून, त्या कक्षात सामान्य माणूस जाण्याची हिंमत करत नाही. प्रत्येकाला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती सतावते आहेत. अशातच बंगळुरूतील चहाचा शौकीन असलेल्या एका कोरोना रुग्णानं थेट रुग्णालयाच्या बाहेर धाव घेतली. त्यानंतर आजूबाजूचे लोक चांगलेच घाबरले. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

बुधवारी सकाळी ७३ वर्षांची ही वयोवृद्ध व्यक्ती चहा पिण्यासाठी अँब्युलन्समधून थेट रुग्णालयाच्या बाहेर गेली, रुग्णालयाजवळच एक चहाची टपरी आहे. तिथे रुग्णाच्या वेषात आलेल्या त्या वयोवृद्धाला चहा टपरीवाल्यानं विचारलं, तुम्ही कुठून आलात, तेव्हा त्यानं सांगितलं, मी कोरोना पेशंट असून, रुग्णालयानं चहा न दिल्यानं तुझ्याकडे चहा प्यायला आलो. त्याच दरम्यान चहावाल्याकडे आधीच चहा पित असलेल्या ग्राहकांना चहाचे कप ठेवून धूम ठोकली आणि चहावाल्याला चहाचे पैसेसुद्धा त्या ग्राहकांनी दिले नाहीत. चहावाल्यानं याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली असून, त्याला चहाची टपरीच बंद करावी लागली आहे. 

त्याचं झालं असं की, रविवारी रात्री त्या वयोवृद्धाला थोडा थकवा आणि डायरियाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात भरती करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपये आधीच जमा करावे लागले. मंगळवारी जेव्हा त्यांचा रिपोर्ट आला, तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. त्या खासगी रुग्णालयानं १.५ लाखांचं बिल फाडलं होतं. ते बिल भरल्यानंतर त्या रुग्णाला कुटुंबीय सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. बंगळुरूतील मालेश्वरम रुग्णालयात त्यांना तात्काळ कोणताही बेड उपलब्ध झाला नाही. तीन तास त्यांनी बेडच्या प्रतीक्षेत अँब्युलन्समध्येच काढले. त्यांच्या नाकातून रक्तही वाहत होतं, पण रुग्णालयानं फक्त त्यांना कॉटन दिला. मोठ्या प्रयत्नांती त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 
 

हेही वाचा

ZOOMला टक्कर देण्यासाठी अंबानींची जिओ मैदानात; JioMeet अ‍ॅप केलं लाँच

सत्तेत आल्यास भारताला देणार 'ही' मोठी भेट, बायडन यांच्या घोषणेनं ट्रम्पना हादरा

CoronaVirus : लढ्याला यश! भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस 'या' दिवशी येणार बाजारात

जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

आता देशातील १०९ मार्गांवर धावणार १५१ खासगी ट्रेन

कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद

...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र 

आजचे राशीभविष्य - 3 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यांतून लाभ होईल

Web Title: CoronaVirus News : corona patient steps out from hospital for a cup of tea in bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.