शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus News : देशातील 'या' ५ राज्यांत कोरोनाचा सर्वात मोठा धोका, आरोग्य मंत्रालयाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 7:23 PM

CoronaVirus News : गेल्या  24 तासांत केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत 49.4 टक्के कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे पुन्हा एकदा युरोपियन देशांमध्ये हाहाकार माजला आहे.युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पहिल्या आलेल्या लाटेपेक्षा जास्त मोठी दिसते.

नवी दिल्ली : भारतातील अनेक राज्यांमध्ये सणासुदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वेगाने वाढत आहे. केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सणांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या पाच आठवड्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

फक्त पाच राज्यांत 49.4% प्रकरणेगेल्या  24 तासांत केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत 49.4 टक्के कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सणसुदीचा काळ सुद्धा याला एक मोठे कारण असू शकते, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. तसेच, ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि आम्ही या राज्यांमधील सरकारसोबत सतत बोलतो आहोत. कोरोनाचे एकूण अॅक्टिव्ह प्रकरणांपैकी 78 टक्के प्रकरणे देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत, असे राजेश भूषण म्हणाले.

गेल्या पाच आठवड्यात मृत्यूचे प्रमाण गेल्या 24 तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची 58 टक्के प्रकरणे पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिसून आली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटकचा समावेश आहे. मात्र, गेल्या पाच आठवड्यापासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आलेख भारतात खाली आला आहे. दरम्यान, भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

युरोप, अमेरिकेत आधीपेक्षा परिस्थिती बिकटकोरोनामुळे पुन्हा एकदा युरोपियन देशांमध्ये हाहाकार माजला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लाट ओसरताना दिसत होती. मात्र आता अचानक युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत माहिती देताना निती अयोगचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल म्हणाले की, हा साथीची रोग युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये खूप वेगाने वाढताना दिसत आहे.

युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पहिल्या आलेल्या लाटेपेक्षा जास्त मोठी दिसते. येथील लोकांवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. याठिकाणी पुन्हा एकदा महामारी शिगेला पोहोचली आहे. अमेरिकेत तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या क्रोधाचा सामना लोकांना करावा लागत आहे. अमेरिकेत सध्या कोरोनावर 28 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत