CoronaVirus News : ऑनलाईन क्लास करणारी मुले पोहोचत आहेत हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 06:03 IST2020-05-19T04:01:39+5:302020-05-19T06:03:17+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : सतत मोबाईल व लॅपटॉपमध्ये अभ्यास केल्याने दृष्टिदोषाची समस्या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी ही मुले आता हॉस्पिटलमध्ये पोहचत आहेत.

CoronaVirus News : ऑनलाईन क्लास करणारी मुले पोहोचत आहेत हॉस्पिटलमध्ये
रायपूर : लॉकडाऊनमध्ये लोक घरात बसून टीव्ही आणि मोबाईलवर ८ ते १० तास वेळ घालवीत आहेत. यात मुलेही मागे नाहीत. अगदी पाच सहा वर्षांची मुलेही आॅनलाईन क्लासमध्ये व्यस्त आहेत.
सतत मोबाईल व लॅपटॉपमध्ये अभ्यास केल्याने दृष्टिदोषाची समस्या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तपासणीसाठी ही मुले आता हॉस्पिटलमध्ये पोहचत आहेत.
तज्ज्ञांचे असे मत आहे की, मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत मुलांचे डोळे हे संवेदनशील असतात. अशावेळी सतत सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोेबाईल व लॅपटॉप पाहून डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, अंधूक दिसणे अशा तक्रारी येत आहेत.
डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉ. प्रीति गुप्ता म्हणतात की, मे महिन्यात तर नेहमीच क्लासेस नसतात. त्यामुळे हे क्लासेस तूर्तास बंद करायला हवेत.
12
वर्षांहून
कमी
वयाच्या मुलांचे आॅनलाईन क्लास बंद व्हायला हवेत. या मुलांच्या डोळ्यातून पाणी येत आहे, डोळ्यात जळजळ होत आहे, डोळे लाल होत आहेत. मोबाईलवर अभ्यास केल्यानेच बहुतांश समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे हे टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
डोळ्यांवर पडत
आहे ताण
- नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, टीव्हीपेक्षा मोबाईलची स्क्रीन छोटी असते. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे अथवा अॅलर्जी, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, दृष्टिदोष अशा समस्या येऊ शकतात. तसेच, सतत डोळ्यांवर ताण पडून स्मृतीवर परिणाम पडू शकतो.
- 5 ते 10 वर्षांच्या मुलांमधये याचा अधिक प्रभाव दिसून येत आहे. आमच्याकडे तर गावागावातून मुले उपचारासाठी येत आहेत. हे मुले मोबाईलवर क्लास करत आहेत.