शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

CoronaVirus News: ...तर तुम्हीच माझ्या जागी कोविड युनिटमध्ये जा; डॉक्टरच्या ट्विटनं सारेच हेलावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 8:19 AM

CoronaVirus News: कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर

मुंबई: देशात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या वेगानं अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे. भारतानं कोरोना बाधितांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकलं आहे. आता केवळ अमेरिकाच भारताच्या पुढे आहे. गेल्या आठवडाभरापासून देशात कोरोनाचे १ लाखहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा वेग धडकी भरवणारा आहे. याचा सर्वाधिक ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे.सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला असं आवाहन वारंवार करूनही सर्वसामान्य नागरिक नियम धाब्यावर बसवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वेगानं होत आहे. दररोज कोरोना बाधितांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. मात्र तरीही अनेक जण गरज नसतानाही घराबाहेर पडत आहेत. याबद्दल एका डॉक्टरनं नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर दीपशिखा घोष यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हजारो लोकांनी त्यांचं ट्विट लाईक केलं आहे.

''कृपया, कृपया मास्क घाला. बाकीच्या लोकांचं मला माहीत नाही. पण शिफ्टच्या विचित्र वेळा आणि माझ्या संपूर्ण सेवा कालावधीत जितके मृत्यू पाहिले नाहीत, तितके मृत्यू पाहून मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकले आहे. यानंतरही तुम्हाला काहीच वाटत नसेल तर कोविड युनिटमध्ये जाऊन माझ्या जागी काम करा. धन्यवाद,'' असं ट्विट करत डॉ. घोष यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. दीपशिखा घोष यांच्या ट्विटबद्दल भावनेबद्दल अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या. एका ट्विटर वापरकर्त्यानं कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली आहे का, अशी विचारणा केली. त्या प्रश्नालादेखील घोष यांनी उत्तर दिलं. ''काही आठवड्यांपासून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोणालाही काळजी नाही. प्रत्येक कुटुंबातली एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याशिवाय त्यांना फरक पडणार नाही,'' अशा शब्दांत घोष यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्याची परिस्थिती हृदयद्रावक असल्याचं घोष यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटलं आहे. ''परिस्थिती फारच हृदयद्रावक आहे. रुग्णांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देणं आणि फोनवर त्यांचा आक्रोश ऐकणं काळीज हेलावून टाकणारं आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वाधिक कठीण काळ आहे. अशा परिस्थितीतून मी याआधी कधीही गेले नव्हते,'' असं घोष यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या