CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 4, 2020 09:24 AM2020-12-04T09:24:45+5:302020-12-04T09:26:41+5:30

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे.

CoronaVirus News An all-party meeting chaired by Prime Minister Narendra Modi to discuss Corona today | CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

Next
ठळक मुद्देया बैठकीत कोरोना लशीच्या योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे.कोरोना लशीसंदर्भातील या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षातील नेते भाग घेण्याची शक्यता आहे.एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवारही या बैठकीत भाग घेण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) देशातील कोरोना स्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे. यावेळी भविष्यातील कोरोना लसीच्या वितरणासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने ही बैठक होईल. यात अनेक पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असेल. यापूर्वी देशातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वेगाने होणारी वाढ लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक घेतली होती.

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. मात्र, या बैठकीत कोरोना लशीच्या योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे.

या नेत्यांचा असेल समावेश -
कोरोना लशीसंदर्भातील या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षातील नेते भाग घेण्याची शक्यता आहे. यात -

- बीजू जनता दलचे चंद्रशेखर साहू
- YSRCP से विजयसाई रेड्डी आणि मिथून रेड्डी
- AIMIMचे इम्तियाज जलील
- शिवसेनेचे विनायक राऊत
- जेडीयूचे आरसीपी सिंह
- काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आजाद
- टीएमसीचे सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ' ब्रायन
- AIADMKचे नवनीत कृष्णन
- DMKचे TRK बालू आणि तिरुचि शिवा 
- जेडीएसचे एचडी देवेगौडा
- एनसीपीचे शरद पवार 
- समाजवादीपक्षाचे राम गोपाल यादव
- बसपाचे सतीश मिश्रा
- राष्ट्रीय जनता जलाचे प्रेम चंद्र गुप्ता
- टीडीपीचे जय गल्ला
- AAPचे संजय सिंह 
- TRSचे नाम नागेश्वर राव
- लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान
- अकाली दलाचे सुखबीर बादल

दिल्लीत गुरुवारी कोरोनामुळे 82 जणांचा मृत्यू - 
देशाची राजधानी दिल्ली येथे गुरुवारी 3,734 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 82 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्लीत 9,424 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली येथे गुरुवारी सक्रीय रुग्णांची संख्या 30,302 वरून 29,120 वर आली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता एकूण करोनाबाधितांची संख्या 95 लाखच्याही पुढे गेली आहे. तर 1.40 लाखांच्या जवळपास लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
 

Web Title: CoronaVirus News An all-party meeting chaired by Prime Minister Narendra Modi to discuss Corona today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.