CoronaVirus News: 70 out of every 100 corona patients in Mumbai are cured | CoronaVirus News : मुंबईत प्रत्येक १०० पैकी ७० कोरोना रुग्ण झाले बरे

CoronaVirus News : मुंबईत प्रत्येक १०० पैकी ७० कोरोना रुग्ण झाले बरे

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोना संक्रमितांची संख्या सतत वाढत असली तरी देशात सर्वाधिक संक्रमितांची संख्या असलेल्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, ठाणे व अहमदाबादमध्ये एकीकडे संक्रमित बरे होण्याची सरासरी सुधारत आहे व दुसरीकडे मृत्यूची संख्याही कमी होत आहे. प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणारांची संख्या दिल्ली, अहमदाबाद व चेन्नईत सर्वांत जास्त आहे, तर चेन्नई, ठाणे व पुण्यात मृत्यूंची संख्या सर्वांत कमी आहे. तथापि, पुण्यात बरे होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
१२ जुलै रोजी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, कोरोना संक्रमित प्रत्येक १०० व्यक्तींपैकी दिल्लीत ७९ पेक्षा अधिक जण बरे झाले आहेत व सुमारे ३ लोकांचा मृत्यू झाला. विविध शहरांत बरे होणाऱ्यांचा व मृत्यूचा आकडा पुढीलप्रमाणे : मुंबई ६९.१४ व ५.७२, चेन्नई ७४.७७ व १.६०, ठाणे ४२.८७ व २.६९, पुणे ४२.८७ व २.८४ तसेच अहमबादेत ७७.६० व ६.६१.
तथापि, या आठवड्यापूर्वी ४ जुलै रोजी दिल्लीत प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणाºयांची संख्या ७० व मृत्यू होणाºयांची संख्या ३ होती. त्याचवेळी मुंबईत हा दर क्रमश: ६४.२३ व ५.८, चेन्नईत ६२.०८ व १.५५ होता. ठाण्यात प्रत्येक १०० पैकी बरे होणाºयांचा व मृत्यूचा आकडा क्रमश: ३८.९५ व २.७४, पुण्यात ४८.४६ व ३.१२, अहमदाबादेत ७६.५ व ६.७९ होता.
दोन आठवड्यांपूर्वी २८ जून रोजी दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८३,०७७ होती. त्यातील ५२,६०७ बरे झाले, तर २,६२३ जणांचा मृत्यू झाला. प्रत्येक १०० रुग्णांपैकी ६३.३२ टक्के जण बरे झाले.

पुण्यात मंदावले बरे होण्याचे प्रमाण
मागील दोन आठवड्यांमध्ये पुण्यात संक्रमित होण्याच्या सरासरीत वेगाने घट झाली आहे. २८ जून रोजी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, एकूण २०,८७० पैकी १०,७०८ बरे झाले; परंतु १२ जुलै रोजी बरे होण्याचे प्रमाण कमी झाले. ताज्या आकडेवारीनुसार, एकूण ३७,३५६ पैकी १६,०१६ रुग्णबरे झाले. यानुसार, बरे होणाºयांचे प्रमाण ५१.३१ टक्क्याांरून घसरून ४२.८७ टक्क्यांपर्यंत उतरले आहे.

प्रमुख शहरांतील कोरोना संक्रमणाची स्थिती
शहर एकूण संक्रमित बरे झाले (%) मृत्यू (%)
दिल्ली ११0९२१ ८७६९२ (७९.0६%) ३३३४ (३.0१%)
मुंबई ९१,७४५ ६३४३१ (६९.१४%) ५२४४ (५.७२%)
चेन्नई ७६,१५८ ५६९४७ (७४.७७%) १२१८ (१.६0%)
ठाणे ५९,४८७ २५८२९ (४३.४२%) १५९८ (२.६९%)
पुणे ३८,३५६ १६0१६ (४२.८७%) १0६0 (२.८४%)
अहमदाबाद २२,९२३ १७७८९ (७७.६0%) १५१५ (६.६१%)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: 70 out of every 100 corona patients in Mumbai are cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.