Coronavirus: MP Nusrat Jahan Reaction on Delhi's Tbiligi tribe's programe in markaj pnm | Coronavirus: दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमावर संताप; खासदार नुसरत जहाँने सुनावले खडेबोल

Coronavirus: दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमावर संताप; खासदार नुसरत जहाँने सुनावले खडेबोल

ठळक मुद्देधर्म नंतर येईल पण सावधान राहणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहेहे कृत्य सहन करण्यापलीकडे आहे. टीएमसी खासदार नुसरत जहाँचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली – कोरोनाग्रस्तांची संख्या भारत वाढत असताना दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमामुळे अनेक स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मौलाना साद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या मौलाना फरार असून त्यांचा शोध घेणं सुरु आहे.

दिल्लीतल्या या कार्यक्रमातून देशभरात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे लोकांमधून या कार्यक्रमाबद्दल राग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तबलिगी जमातीच्या या कार्यक्रमावर टीएमसी खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ हीदेखील संतापल्याचं दिसून आलं. एका न्यूज चॅनेलला मुलाखत देताना ती म्हणाली की, देशात अनेक धर्म आहे. मात्र कोणत्याही धर्माने अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित केले नाहीत. मरकज प्रकरणाने आपल्याला खूप मागे आणलं आहे. हे कृत्य सहन करण्यापलीकडे आहे. कोणताही आजार धर्म, गरीब-श्रीमंत बघून हल्ला करत नाही असं तिने बजावलं.

तसेच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, आज देश ज्या संकटातून जात आहे अशावेळी आपल्याला राजकारण, धर्म आणि जातीबाबत बोलणं बंद केलं पाहिजे. धर्म नंतर येईल पण सावधान राहणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आताची वेळ संवेदनशील आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, या कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला घरातच राहून सुरक्षित राहायला लागेल असंही नुसरत जहॉँने सांगितले.

दिल्लीत लॉकडाऊन असूनही निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात २ हजारांपेक्षा अधिक लोक एकत्र आले होते. यामुळे सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. यातील ९०० जण महाराष्ट्रात परतले आहेत. तर ३३४ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. ७०० जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठवलं आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, किर्गिझस्तान यांच्यासह २,००० हून अधिक प्रतिनिधींनी निजामुद्दीन येथे असलेल्या मरकजमध्ये १ ते १५ मार्च दरम्यान धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण समोर आली आहेत. मरकजमधील २४ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

...तर ‘या’ कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करणार नाही; केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्य सज्ज, संरक्षणमंत्र्यांना दिली माहिती; पाहा कशी केलीय तयारी?

CoronaVirus : धक्कादायक! जीव वाचविण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवरच दगडफेक... पाहा व्हिडीओ

coronavirus : अमेरिकेत एक दिवसात हजारांवर कॊरोनाबळी, रुग्णांची संख्या दोन लाखांवर

Coronavirus: चिंताजनक! देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण; मुंबईतील ३ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

 

Web Title: Coronavirus: MP Nusrat Jahan Reaction on Delhi's Tbiligi tribe's programe in markaj pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.