शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

CoronaVirus News: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात सापडले सर्वाधिक रुग्ण; अमेरिका, ब्राझीलला टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 3:02 AM

बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६८ टक्के; एकूण रुग्णसंख्या २० लाख ८८ हजार; ४२,५१८ बळी

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या अमेरिका, ब्राझीलमधील नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. देशात शुक्रवारी कोरोनाचे ६१,३३७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २०,८८,६११ झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९३३ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ४२,५१८ वर पोहोचली आहे, तर देशात मृतांचे प्रमाण २.0४ टक्के इतके कमी झाले आहे. सध्या देशात ६,१९,०८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १४,२७,००६ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ६८.३२ टक्के झाले आहे. सलग दहाव्या दिवशी कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ४,६९०, दिल्लीत ४,०८२, कर्नाटकमध्ये २,९९८, गुजरातमध्ये २६०५, उत्तर प्रदेशमध्ये १,९८१, पश्चिम बंगालमध्ये १,९५४, आंध्र प्रदेशमध्ये १,८४२, मध्य प्रदेशमध्ये ९६२ इतकी आहे. अन्य राज्यांतही कोरोनामुळे बळी गेलेल्यांची लक्षणीय संख्या आहे. या संसगार्मुळे मरण पावलेल्यांपैकी ७० टक्के लोकांना एकापेक्षा जास्त व्याधी होत्या.कोरोना चाचण्या २ कोटी ३३ लाखइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ५,९८,७७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आता देशात कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २,३३,८७,१७१ झाली आहे.६ दिवसांत देशात 3,28,903 नवीन रुग्णकेंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सहा दिवसांत कोरोनाचे ३,२८,९०३ रुग्ण सापडले. या कालावधीत अमेरिकेमध्ये ३,२६,१११ व ब्राझीलमध्ये २,५१,२६४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सहापैकी चार दिवशी म्हणजे २, ३, ५ व ६ आॅगस्ट रोजी जगातील कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण भारतात सापडले होते.देशामध्ये कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने २० लाखांचा टप्पा गुरुवारी ओलांडला. कोरोना रुग्णसंख्येचा १० लाखांवरून वीस लाखांपर्यंतचा प्रवास भारताने अमेरिका, ब्राझीलपेक्षाही वेगाने केला आहे. २० लाख रुग्णसंख्या झाल्याच्या टप्प्यावर कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे भारतातील प्रमाण ३.१ टक्के असून ते इतर देशांपेक्षा जास्त आहे.मजूर पुन्हा कामाच्या ठिकाणीउत्तर प्रदेशातील मजूर पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. अशाच एका मजुराचे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर आनंद विहार बस स्थानकावर शनिवारी टिपलेले छायाचित्रे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या