शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
3
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
4
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
5
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
6
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
7
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
9
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
10
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
11
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
12
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
13
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
14
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
15
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
16
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
17
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
18
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
19
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
20
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: "मोदी है तो मुमकीन है", घटत्या जीडीपीवरून राहुल गांधींचा केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 13:37 IST

कोरोना विषाणू आणि कोरोनाच्या संसर्गात पायबंद घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटले असून, व्यवसाय विक्रीवरही परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देनारायण मूर्ती यांनी हल्लीच केलेल्या एका विधानाचा आधार घेऊन राहुल गांधींचा मोदी सरकारला टोलादेशाचा आर्थिक विकासाचा दर यावर्षी स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल, असे विधान नारायण मूर्ती यांनी केले होतेमोदी है तो मुमकीन है, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. इन्फोसिसचे प्रमुख एन. आर. नारायण मूर्ती यांनी हल्लीच केलेल्या एका विधानाचा आधार घेऊन राहुल गांधींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर यावर्षी स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल, असे विधान नारायण मूर्ती यांनी केले होते. त्यावरून मोदी है तो मुमकीन है, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.कोरोना विषाणू आणि कोरोनाच्या संसर्गात पायबंद घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटले असून, व्यवसाय विक्रीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाच्या विकासदरात मोठी घट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण मूर्ती यांनी देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत मोठे विधान केले होते.कोरोनामुळे यावर्षी देशाचा आर्थिक विकास दर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी राहण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर रुळावर आणणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या जीडीपीमध्येही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण दिसून येऊ शकते, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले होते. नारायण मूर्ती देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाला पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी व्यवस्था देशात निर्माण व्हावी, अशी अपेक्षा नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली.नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, भारताच्या जीडीपीमध्ये किमान पाच टक्के आकुंचन होण्याचा अंदाज आहे. १९४७ नंतर देशातील सर्वात वाईट जीडीपी यावर्षी दिसू शकते. जागतिक जीडीपीमध्ये घट झाली आहे. जगभरातील व्यापार अडचणीत आहे. जागतिक प्रवासही पूर्णपणे ठप्प झालेला आहे, अशा परिस्थितीत जागतिक जीडीपीमध्ये पाच ते दहा टक्के घट होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार