शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus: मोदी सरकारकडून राज्यांना तात्काळ कोट्यवधींचा निधी; ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 9:52 PM

राज्यांना थोडी थोडकी नव्हे, तर 17,287.08 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 15व्या वित्त आयोगाच्या 'महसूल तूट अनुदाना'अंतर्गत 6,195.08 कोटी रुपये जाहीर केले आहेत.

नवी दिल्लीः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रानंही बऱ्याच राज्यांत मदत करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं अनेक राज्यांना मोठ्या प्रमाणात निधीचं वाटप केलं आहे. राज्यांना थोडं थोडकं नव्हे, तर 17,287.08 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 15व्या वित्त आयोगाच्या 'महसूल तूट अनुदाना'अंतर्गत 6,195.08 कोटी रुपये जाहीर केले आहेत. हे अनुदान 14 राज्यांना देण्यात आले आहे.या राज्यांना 6,195.08 कोटी रुपये मिळालेअर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी हा निधी जाहीर केल्याची माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांना अनुदानाच्या अंतर्गत 6,195.08 कोटी रुपये देण्यात आले आहेत.SDRMFअंतर्गत राज्यांना 11,092 कोटी रुपये देण्यात आलेया व्यतिरिक्त 11,092 कोटी रुपये राज्यांना आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आले आहेत. 'राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी' (एसडीआरएमएफ) अंतर्गत पहिली हप्ता म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधला संवादकेंद्र सरकारने राज्यांना पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रालयाच्या या प्रस्तावाला गुरुवारी मान्यता दिली. बर्‍याच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण वाढत आहेत. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी हा निधी जाहीर करण्यास मान्यता दिली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस