शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

coronavirus : गावाने ज्या शाळेत आसरा दिला, मजुरांनी कौशल्य दाखवत तिचा चेहरामोहरा बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 4:03 PM

गावाकडे पलायन करणाऱ्या मजुरांनी क्वारेंटाईन काळात केले कौतुकास्पद काम

ठळक मुद्देलॉकडाऊनदरम्यान मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फरफट झालीएका शाळेत गावाकडे पलायन करणाऱ्या काही मजुरांना आयसोलेट करण्यात आले होतेया मजुरांनी गावकऱ्यांनी केलेल्या मदतीची नेहमी लक्षात राहील अशी परतफेड केली

जयपूर - कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. या लॉकडाऊनदरम्यान सर्व आर्थिक व्यवहार बंद झाल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फरफट झाली. तसेच रोजगार गेल्याने गावची वाट धरणाऱ्या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यातील अनेक मजुरांना विविध ठिकाणी क्वारेंटाईन करण्यात आले. अशाच एका ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मजुरांना गावकऱ्यांनी आधार दिला. त्यानंतर या मजुरांनी गावकऱ्यांनी केलेल्या मदतीची नेहमी लक्षात राहील अशी परतफेड केली. अडचणीत असलेल्या या गरिबांनी दिलेली भेट पाहून गावकऱ्यांचेही मन भरून आले.

 याबाबत सविस्तर हकीकत अशी की, राजस्थानमधील सीकर येथील पलसाना येथे एका शाळेत गावाकडे पलायन करणाऱ्या काही मजुरांना आयसोलेट करण्यात आले होते. यामध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील 54 मजुरांचा समावेश होता. या मजुरांची गावचे सरपंच आणि गावातील दानशूर चांगली व्यवस्था केली.  दरम्यान,  गावकऱ्यांनी केलेली मदत पाहून भारावलेल्या या मजुरांनी गावासाठी काहीतरी करण्याचा विचार बोलून दाखवला. तसेच त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेची रंगरंगोटी करण्याची तयारी दाखवली. 

त्यानंतर या मजुरांना गावकऱ्यांनी रंगरंगोटीचे सामान उपलब्ध करून दिले. त्यानंतर या मजुरांनी आपले कौशल्य दाखवत शाळेचे रंगरूप बदलून टाकले. दरम्यान, येथील आयसोलेशन केंद्राची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाचे सचिव जगत सिंग पंवार यांनी या कामाचे कौतुक केले. 

पलसाना गावचे सरपंच रूपसिंह शेखावत यांनीही या मजुरांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. या शाळेत गेल्या नऊ वर्षांपासून रंगरंगोटी झाली नव्हती. त्यामुळे सर्व शिक्षकांनी शाळेच्या रंगरंगोटी स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक सामुग्री आणून दिली. मात्र या मजुरांनी कामाचे पैसे घेण्यास नकार दिला, असे या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र मीणा यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान