शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

coronavirus: स्थलांतरितांमुळे केरळमध्ये कोरोना फैलावण्याचा धोका, रुग्णांपैकी ७० टक्के बाहेरून आलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:40 AM

कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक ...

कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक देशांतूून तसेच विविध राज्यांतून केरळचे स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने परतत असून, त्यांच्यामुळे कोरोनाची लागण पुन्हा मोठ्या प्रमाणावर होणार नाही यासाठी राज्य सरकारला अत्यंत दक्ष राहावे लागणार आहे.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्यामध्ये असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे स्थलांतरित कामगार आहेत. त्यांच्यामुळे केरळमधील इतर लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. सध्या विविध राज्यांतून वाहनांनी ३३,११६ स्थलांतरित कामगार केरळच्या सीमेपर्यंत आले आहेत. इतर देशांतून हवाईमार्गे १,४०६, तर सागरीमार्गाने ८३३ जण राज्यामध्ये परततील. यात आणखी मोठी भर काही दिवसांत पडणार आहे.केरळमधील वैद्यकीय व्यवस्थेची अनेक जण वाखाणणी करतात. विदेश तसेच विविध राज्यांतून केरळमध्ये आगामी काळात सुमारे ४ लाख २० हजार लोक पुन्हा परतण्याची शक्यता आहे. त्यात विविध राज्यांतून केरळला परतणाऱ्या दीड लाख स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे.इतक्या सर्व लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देतानाच कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईनची चोख व्यवस्था राज्याच्या वैद्यकीय यंत्रणेला उभारावी लागेल. तीच तर खरी कसोटी आहे.प्रवाशांची अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट करून मगच त्यांना विमानात बसविण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी विमान कंपन्यांना द्यावा, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली आहे. आंतरराज्य प्रवासावरही काही निर्बंध असावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना नुकतेच एका बैठकीतसांगितले.मार्गदर्शक तत्त्वांत फरकक्वारंटाईनसंदर्भात केरळ राज्य सरकार व केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत फरक आहे. त्यामुळे त्याबाबत केरळ सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.मजुरांमध्ये संसर्गमध्य-पूर्वेतील देशांत बांधकाम मजुरांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तिथे अशा किती लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मध्य-पूर्व देशांमध्ये कोरोनामुळे २० केरळी लोक आतापर्यंत मरण पावल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत