शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 11:02 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ती 45 लाखांच्या वर गेली आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ती 45 लाखांच्या वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 303,405 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर गेला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 3967 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 81,970 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (15 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3967 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 81,970 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2649 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 51401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 27920  रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

कोरोना  व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्य अधिकृत सूत्रांच्या विश्लेषक माहितीनुसार भारतातील कोरोनाचा आलेख सपाट होत असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, तर मृत्यू दर आणि रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अवधीही कमालीचा वाढल्याने या आकडेवारीने आशा पल्लवित झाल्या आहेत.

उपरोक्त अधिकृत सूत्रांच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी 33.6 टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही 3.3 टक्क्यांवरून 3.2 टक्क्यांवर आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावधीतही गेल्या तीन दिवसांत लक्षणीय वाढ (12.2) झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दरही 5.5 टक्क्यांवर घसरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले...

CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : भुकेसाठी काय पण! बिस्किटांवरून मजुरांचा स्टेशनवर राडा; Video व्हायरल

CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार

CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू