शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बापरे! सलग पाचव्या दिवशी 250हून अधिक मृत्यू, एकाच दिवसात अडीच महिन्या एवढे रुग्ण; गंभीर होतेय देशाची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 11:51 IST

2 जूनलाला देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखवर पोहोचली होती. हीच संख्या 7 जूनला अडीच लाखांच्याही पुढे गेली आहे.

ठळक मुद्देदेशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2,57,334 वर पोहोचली आहे.केवळ 5 दिवसांत जवळपास 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत.सलग दुसऱ्या दिवशी देशात 10 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरत चालला आहे. रोज समोर येणारे विक्रमी केरोना बाधित असोत अथवा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या, हे संपूर्ण चीत्र भयभीत करणारे आहे. सुरुवातीच्या अडीच महिन्यांच्या काळात देशात एकूण जेवढे कोरोना रुग्ण होते, एवढे आता एकाच दिवसात समोर येऊ लागले आहेत.

केवळ 5 दिवसांत 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित -एकिकडे मॉल्सपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत अणेक सार्वजनिक ठिकाणे सोमवारपासून खुली होते आहेत. तर दुसरीकडे कोरोना व्हायरस घातक रूप धारण करू लागला आहे.  राज्य सरकारांच्या आकडेवारीनुसार, आता देशतील कोरोनाबाधितांच्या संख्येने अडीच लाखांचा आकडाही ओलांडला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2,57,334 वर पोहोचली आहे. केवळ 5 दिवसांत जवळपास 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. 2 जूनलाला देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखवर पोहोचली होती. हीच संख्या 7 जूनला अडीच लाखांच्याही पुढे गेली आहे.

CoronaVirus News: भारतात 100 दिवसांत होणार कोरोनाचा खात्मा, पण...; तज्ज्ञांनी व्यक्त केली 'ही' गंभीर भीती!

सुरुवातीच्या अडीच महिन्या एवढे कोरोनाबाधित एकाच दिवसात! -देशात रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एकाच दिवसात 10,700हून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले. सलग दुसऱ्या दिवशी देशात 10 हजारहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. शनिवारी 10,434 नवे रुग्ण समोर आले होते. देशात कोरोना आल्यानंतर पुढच्या अडीच महिन्यांत जेवढे रुग्ण आढळले, तेवढे रुग्ण आता एकाच दिवसात सापडू लागले आहेत. देशातील कोरोना संक्रमणाच्या वेगाचा संकटाचा अंदाज या एकाच गोष्टीवरू लावता येऊ शकतो.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

देशात 30 जानेवारीला पहिला कोरोना संक्रमित व्यक्ती सापडला होता. त्यानंतर 74 दिवसांनी म्हणजेच 13 एप्रिलला एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 हजारचा आकडा ओलांडला होता.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया 

सलग पाचव्या दिवशी 250 हून अधिक लोकांचा मृत्यू -देशातील कोरोनाबाधिताच्या मृत्यूचा आकडा 7 हजारच्या पुढे गेला आहे. आतातर गेल्या पाच दिवसांपासून कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या 250 हून अधिक आहे. रविवार तर कोरोनामुळे 262 जणांचा मृत्यू झाला. मात्र, शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत ही संख्या कमी होती. शनिवारी 297 तर शुक्रवारी 295 लोकांचा मृत्यू झाला होता. देशात कोरोनामुळे  आतापर्यंत 7,201 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात चीनपेक्षाही अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 85 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत 83,040 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रविवारी महाराष्ट्रात तब्बल 3,007 नवे कोरोनाबाधित समोर आले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल