CoronaVirus News: Video; भारताच्या शूर INS विक्रमादित्यने कोरोनाला असा दिला 'पंच'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 11:25 PM2020-05-03T23:25:50+5:302020-05-04T00:03:40+5:30

सध्या संपूर्ण जग आणि भारतही कोरोनासोबत त्वेशाने लढत आहे. या लढाईत प्रत्येक नागरीक कोरोना वॉरियर्ससोबत उभा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने रविवारी आपल्या डॉक्टरांचे अनोख्या अंदाजात अभिनंदन केले.

CoronaVirus Marathi News  A strong punch by india to corona virus​​​​​​​ | CoronaVirus News: Video; भारताच्या शूर INS विक्रमादित्यने कोरोनाला असा दिला 'पंच'

CoronaVirus News: Video; भारताच्या शूर INS विक्रमादित्यने कोरोनाला असा दिला 'पंच'

googlenewsNext
ठळक मुद्देशत्रूने भारताकडे जेव्हा-जेव्हा तिरप्या नजरे पाहिले, तेव्हा-तेव्हा भारतीय जवावांनी त्यांना धूळ चारली आहेया लढाईत प्रत्येक नागरीक कोरोना वॉरियर्ससोबत उभा आहे10 लढाऊ विमाने, 20 हेलिकॉप्टर्सचा कोरोना वॉरियर्सना सॅल्यूट

नवी दिल्ली : शत्रूने जेव्हा-जेव्हा भारताकडे तिरप्या नजरे पाहिले, तेव्हा-तेव्हा भारतीय जवावांनी त्यांना धूळ चारली आहे. सध्या संपूर्ण जग आणि भारतही कोरोनासोबत त्वेशाने लढत आहे. या लढाईत प्रत्येक नागरीक कोरोना वॉरियर्ससोबत उभा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने रविवारी आपल्या डॉक्टरांचे अनोख्या अंदाजात अभिनंदन केले.

यावेळी आयएनएस विक्रमादित्यवर लाल रंगाच्या लाइट्सनी कोरोनाची, तर हिरव्या रंगाच्या लाइट्सनी 'पंच'ची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. ही प्रतिकृती तयार करून भारत कोरोनाचा धैर्याने सामना करत असल्याचे दाखवण्यात आले. असेच अनेक फोटो आहेत. ज्यांनी अनेकांची मनं जिंकली. एवढेच नाही, तर कोरोना वॉरियर्सचा उत्सहही वाढवला.

हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

भारतीय हवाई दलाने केला 'कर्मवीरांना' सलाम


तामिळनाडूतही कोरोना वॉरियर्सना सॅल्यूट


कोरोना व्हायरसशी सामना करताना तामिलनाडूमध्ये भारतीय नौदलाने आयएनएस सह्याद्री आणि आयएनएस कमरोटाने चेन्नईमध्ये मरीना बीचजवळ फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अशा प्रकारे अभिनंदन केले. 

CoronaVirus News : 'या'मुळे घेण्यात आला 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय, नीती आयोगाने सांगितले 'असे' कारण

आंध्र प्रदेशातील विरांनी केला कोरोना वॉरियर्सना सॅल्यूट

CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

...जेव्हा प्रकाशाने उजळून निघाले जहाज

तिरुवनंतपुरममध्ये भारतीय तट रक्षक दलाने जहाजावर दुधासारख्या रंगाची रोशनाई केली होती. आणि विशेष अंदाजात कोरोनाशी लढणाऱ्या योध्यांना सॅल्यूट केला.

कोच्चीमध्येही कोरोना वॉरियर्सना भारताचा सॅल्यूट

भारतीय नौदलाने अशाप्रकारे फ्रंटलाइन वर्कर्सना Thank You म्हटले.

CoronaVirus News : चिंताजनक! देशभरात 24 तासांत 2487 जण कोरोना पॉझिटिव्ह, 83 जणांचा मृत्यू

10 लढाऊ विमाने, 20 हेलिकॉप्टर्सचा कोरोना वॉरियर्सना सॅल्यूट


असिस्टंट चीफ ऑफ एयर स्टाफ ऑपरेशन्स एयर व्हाइस मार्शल सूरत सिंह म्हणाले, 'एअरफोर्सचे चार मालवाहू एयरक्राफ्ट, 10 लढाऊ विमाने आणि 15-20 हेलिकॉप्टर्सनी कोरोना योद्ध्यांचे आकाशातून अभिनंदन केले. जास्तीत जास्त राज्यांच्या राजधान्या आणि 72 हून अधिक रुग्णालयांचा यात समावेश होता.'

Web Title: CoronaVirus Marathi News  A strong punch by india to corona virus​​​​​​​

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.