नवी दिल्ली : कोरोनाची सुरुवात झालेल्या चीनला आता भारताने मागे टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना बाधितांची संख्या ८३०७२ झाली असून चीनमध्ये ८२९३३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जगभरातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणारी वेबसाईट worldometers.info नुसार चीनमध्ये दिवसभरात केवळ ४ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर भारतात केवळ महाराष्ट्रातच आज १५०० वर रुग्ण सापडले आहेत. तर देशभरात आज ३४९८ रुग्ण सापडले आहेत.
जगभरात कोरोनाने कहर केला आहे. भारतात कोरोना थोडा धीम्या गतीने पसरत असला तरीही आजची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. चीननंतर सुरुवातील इटली, इराण नंतर संपूर्ण युरोप आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. आता रशियामध्येही कोरोनाचे संकट दाटून आले आहे. मात्र, आज चीन जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या पहिल्या १० देशांच्या यादीतून बाहेर गेला आहे. या यादीमध्ये भारत ११ व्या स्थानावर तर चीन १२ व्या स्थानावर आहे. एकीकडे भारतात रुग्णांची संख्या कमालीची वाढत असताना चीनमध्ये खूपच कमी रुग्ण सापडत असल्याने भारत वर तर चीन खालच्या दिशेने सरकणार आहे.
पहिल्या दहामध्ये कोणते देश?कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक झालेल्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, ब्राझिल, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्तान आणि इराण आहेत. यानंतर भारताचा नंबर लागतो. सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून तिथे १४.६० लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर ८७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus राज्यात नव्या रुग्णांची संख्या वाढतीच; मृतांचा आकडा १०६८ वर
EPFO चा मोठा दिलासा; लॉकडाऊनमध्ये पीएफ भरण्यास उशिर झाला तर दंड माफ
सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा
मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार
शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन
Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली