सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 07:37 PM2020-05-15T19:37:24+5:302020-05-15T20:47:23+5:30

मुंबईची तुलना कोणत्याही शहराशी करू नये. कारण मुंबईत मोठमोठ्या झोपडपटट्या आहेत. दाट लोकवस्ती आहे. यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी रुग्ण सापडत आहेत, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

CoronaVirus Maharashtra Government will recruit more than 30000 seats in hospitals: Rajesh Tope hrb | सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

सज्ज व्हा! राज्य सरकार दीड महिन्यात बंपर भरती करणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

Next

मुंबई : राज्यभरात कोरोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १५००० मध्यम बाधित रुग्ण आणि १००० आयसीयु बेडची व्यवस्था करण्य़ात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 


मुंबईची तुलना कोणत्याही शहराशी करू नये. कारण मुंबईत मोठमोठ्या झोपडपटट्या आहेत. दाट लोकवस्ती आहे. यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी रुग्ण सापडत आहेत. मुंबईत आठ मोठे अनुभवी अधिकारी काम करत आहेत. तसेच काही अधिकारी, संस्था यामध्ये काम करत आहेत. आमदारानाही यामध्ये सहभागी करण्यात येत आहे. पण मुंबई महापालिकेने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरातही भरती करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. 


माझ्या आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या जागा पुढील दीड महिन्यात भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. त्यांचे गुण, अंतर्गत परिक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत. नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क हे विचारात घेतले जातील. आज उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. ते दमल्यानंतर नवीन दमाची टीम असणे गरजेचे आहे. यामुळे ही भरती तत्काळ करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. 


मुंबईमध्ये लॉकडाऊन रेडझोन असल्याने त्यावर निर्णय घेण्यात येईल. कन्टेन्मेंट झोनबाहेर काही दुकाने उघडता येतील का, यावर मुख्यमंत्री येत्या १८ तारखेला निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. 

 

महत्वाच्या बातम्या...

मजुरांना पायी जाण्यापासून रोखू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

शेतमालाच्या किंमतीला मिळणार कायद्याचे संरक्षण; अर्थमंत्र्यांचे मोठे आश्वासन

Atmanirbhar Bharat Abhiyan कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Corona Lockdown कोरोनाचे वेगळेच, लॉकडाऊनने घेतले शेकडो बळी; 91 जणांनी तर आत्महत्याच केली

Web Title: CoronaVirus Maharashtra Government will recruit more than 30000 seats in hospitals: Rajesh Tope hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.