शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 10:09 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 27,292,583 वर गेली असून आतापर्यंत 887,554 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. 

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सोमवारी (7 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,802 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,016 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 42,04,614 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 71,642  वर पोहोचला आहे. 

कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,82,542  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 32,50,429 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोना व्हायरसचं हे संकट 2021 पर्यंत असणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच दिल्लीसह देशातील काही भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील म्हटलं आहे.

AIIMSच्या प्रमुखांनी दिली कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती

डॉ. रणदीप गुलेरिया हे केंद्र सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्समधील एक अत्यंत महत्त्वाचे सदस्य आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलं आहे. कोरोनाचं हे महाभयंकर संकट 2021 पर्यंत जाईल असं आपण सांगू शकत नाही. मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत होता तो मात्र कमी झाला आहे हे निश्चित सांगता येईल असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. "काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशातील काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे कोरोना चाचण्यांची वाढवण्यात आलेली संख्या आणि दुसरं म्हणजे लोक नियमांचं पालन करत नाहीत." कोरोनावर मात करण्यासाठी या वर्षाच्या शेवटी कोरोना लस उपलब्ध होऊ शकते अशी आशा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

जिद्दीला सलाम! शिक्षणासाठी गर्भवतीने स्कूटरवरून केला 1200 किमीचा खडतर प्रवास अन्...

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"

माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार

धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्...

CoronaVirus News : ऑनलाईन क्लास दरम्यान प्राध्यापिकेची तब्येत बिघडली, कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोर झाला मृत्यू

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूBrazilब्राझील