शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

CoronaVirus News : भारतासाठी आनंदाची बातमी; "अमेरिका, इटली सारखा धोका नाही, अत्यंत वाईट परिस्थितीसाठीही देश तयार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 3:25 PM

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत, कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट 11 दिवसांचा राहिला आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता, डबलिंग रेटता 9.9 दिवस एवढा होता.

ठळक मुद्देअमेरिका, इटली, स्‍पेन आणि फ्रान्स सारख्या विकसित देशांमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहेदेश वाईटातल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठीही तयार - हर्षवर्धानआता भारतातील रिकव्हरी रेट 29.9% झाला आहे

नवी दिल्‍ली : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घालत आहे. अमेरिका, इटली, स्‍पेन आणि फ्रान्स सारख्या विकसित देशांमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारतात मात्र, तशी परिस्थिती उद्भवणार नाही, असे केंद्र सरकारचा अंदाज सांगतो. यासंदर्भा, आरोग्य तथा कुटुंब कल्यानमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की 'देश वाईटातल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठीही तयार झाला आहे. अनेक विकसित देशांमध्ये जशी परिस्थिती उद्भवली, तशी स्थिती भारतात उद्भवेल, असे दिसत नाही.'

या गोष्टीमुळे दिसतो आशेचा कीरण -केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत, कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट 11 दिवसांचा राहिला आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता, डबलिंग रेटता 9.9 दिवस एवढा होता. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, देशात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा दर 3.3 टक्के आहे. तर भारतातील रिकव्हरी रेट 29.9% झाला आहे. हे फार चांगले संकेत आहेत, असेही हर्षवर्धन म्हणाले.

आणखी वाचा - CoronaVirus News : दीड महिन्यानंतर येऊ शकतं कोरोनावरील स्वस्त औषध, DGCIनं दिली 'क्लिनिकल ट्रायल'ची परवानगी

रुग्णांना डिस्‍चार्ज देण्याच्या नियमांत बलद -कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पाळण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी याबद्दलची माहिती देण्यात आली. नव्या नियमांनुसार एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्यास आणि त्याची प्रकृती स्थिर असल्यास १० दिवसांतच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. डिस्चार्जनंतर रुग्णाला १४ दिवसांऐवजी ७ दिवस घरात क्वारंटिन करण्यात येईल. चौदाव्या दिवशी टेलि-कॉन्फरन्सच्या माध्यमातून रुग्णाची माहिती घेतली जाईल. 

देशात जवळपास 2 हजार जणांचा  मृत्यू -भारतात शनिवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 59 हजारवर पोहोचली. तर आतापर्यंत जवळपास 1,981 जणांचा कोरोनाने बळी घेतला. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे आतापर्यंत 19,063 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 731 जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका

जगात 2.70 लाख जणांचा मृत्यू -जगभरात आतापर्यंत 2,70,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखहून अधिक झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. येथे आतापर्यंत 77,180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड असून, येथे आतापर्यंत 31,316 जणांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे जगाची स्थिती : CSSEने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक 1,283,929 रुग्ण आढळले आहेत. यानंतर स्पेन, येथे 222,857, इटली 217,185, इग्लंड (212,629), रशिया (187,859), फ्रान्स 176,202, जर्मनी 170,588आणि, ब्राजीलमध्ये 146,894 रुग्ण आढळून आले आहेत.

आणखी वाचा - 'औरंगजेबा'ने बनवले होते मुस्लीम, तब्बल 40 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात केला प्रवेश

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmericaअमेरिकाItalyइटलीIndiaभारत