CoronaVirus Marathi News india israel super rapid covid 19 testing technonoly | CoronaVirus News : भारीच! फक्त फुंकर मारा अन् एका मिनिटात कोरोना झाला की नाही हे ओळखा; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News : भारीच! फक्त फुंकर मारा अन् एका मिनिटात कोरोना झाला की नाही हे ओळखा; तज्ज्ञांचा दावा

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्याही 69 लाखांवर गेली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान भारत आणि इस्रायल संयुक्तपणे अवघ्या काही क्षणांत कोरोना व्हायरसच्या चाचणीचं एक गेमचेंजर तंत्रज्ञान तयार करत आहे. रॅपिड टेस्टिंग रिसर्च आता शेवटच्या टप्प्यात असून येत्या काही दिवसांतच हे किट तयार होणार आहे. 

रॅपिड टेस्टिंग किटच्या मदतीने अवघ्या एका मिनिटांहूनही कमी वेळेत कोरोनाचा रिपोर्ट मिळणार आहे. नळीमध्ये फुंकर मारून कोरोना झाला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. भारतातीलइस्रायलचे राजदूत रॉन माल्का यानी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. येणाऱ्या काळात भारत आणि इस्रायल या दोन देशांमध्ये चांगल्या संबंधांसाठी आरोग्यसेवा हे महत्त्वाचे क्षेत्र असणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

30-40-50 सेकंदात चाचणीचा रिपोर्ट मिळणार

भारत आणि इस्रायल हे दोन देश तयार करत असलेली ही रॅपिड टेस्ट टेक्नॉलॉजी एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे फक्त एका मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. यासाठी ज्या व्यक्तीची चाचणी करायची आहे त्या व्यक्तीने एका नळीत फक्त तोंडाने फुंकर मारायची आहे. यामुळे 30-40-50 सेकंदात चाचणीचा रिपोर्ट मिळणार आहे अशी माहिती रॉन माल्का यांनी दिली आहे. संपूर्ण जगासाठी ही एक आनंदाची बातमी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच ही टेक्नॉलॉजी एअरपोर्ट आणि इतर ठिकाणी वापरण्यात येणार आहे असंही माल्का यांनी सांगितलं आहे. 

भारत आणि इस्रायलची कमाल, तयार केलं गेमचेंजर तंत्रज्ञान तयार  

कोरोना चाचणीसाठी येणार खर्चही कमी असणार आहे. कारण या चाचणीच्या रिपोर्टसाठी नमुना लॅबमध्ये पाठवण्याची आवश्यकता नसते. तेथल्या तेथेच रिपोर्ट मिळतो हेच या किटचं खास वैशिष्ट्य आहे. भारत आणि इस्रायलने संयुक्तपणे चार चाचणी तंत्रज्ञानाची चाचणी घेतलेली आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर या चाचणीसाठी नमुने गोळा करण्यात आले. या तंत्रामध्ये ब्रेथ अ‍ॅनलायझर आणि ध्वनीची चाचणीचा देखील समावेश आहे. यामध्ये कोरोना झाला आहे की नाही हे लवकर समजण्याची क्षमता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कोरोनाग्रस्तांसाठी ठरू शकतं घातक, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका कायम असल्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या सण-समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात मास्क घालूनच सर्व सण साजरे करावेत असा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे. दिवाळी फटाके वाजवले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात फटकांमुळे होणारं प्रदूषण हे रुग्णांसाठी घातक ठरू शकतं. कोरोनाग्रस्त तसेच विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. फटाक्यांमुळे होणारा धूर आणि प्रदूषण हे सर्वसामान्यांसह, कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींसाठीही घातक ठरू शकतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राजस्थान राज्य मानवाधिकार आयोगाने फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच डॉक्टरांनी कोरोना काळात फटाक्यांचा वापर टाळण्याबाबत इशारा दिला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News india israel super rapid covid 19 testing technonoly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.