शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus : जगातील दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला, 'या' गोष्टींनी वाढवली देशाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 11:24 IST

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार घातला आहे. भारतही घातक कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. मात्र अशातच शनिवारी ...

ठळक मुद्दे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पा ओलांडला आहे. नव्या कोरोना रुग्णांच्या बाततीत जागतीक पातळीवर भारतचा शेअर वाढला आहे.जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा 17.5 टक्के एवढा आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार घातला आहे. भारतही घातक कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. मात्र अशातच शनिवारी आलेले आकडे देशाच्या दृष्टीने भीती वाढवणारे आहेत. या आकड्यांचा विचार करता, नव्या कोरोना रुग्णांच्या बाततीत जागतीक पातळीवर भारतचा शेअर वाढला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पा ओलांडला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढणे ही आधिपासूनच धोक्याची घटना आहे. 

जागतीक पातळीवर भारताचा शेअर वाढला -कोरोनाबाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रोज नवा आणि विक्रमी आकडा समोर येत आहे. यातच डेली ग्लोबल केसेसमध्ये (जागतीक पातळीवर रोज वाढणारी रुग्ण संख्या) भारताचा शेअर 12 टक्के झाला आहे. शुक्रवारपर्यंत हेच प्रमाण 11.8 टक्के होते.

महाराष्ट्रात कोरोना अधिक घातक -कोरोनामुळे महाराष्ट्रात शनिवारी 223 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर महाराष्ट्रातील मृतांच्या आकड्याने 10 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 22,123 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 45 टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत.

पॉझिटिव्हिटी रेट वाढला -देशातील कोरोना व्हायरस पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढत आहे. हा चिंतेचा विषया आहे. एकूण टेस्टवर किती रुग्ण पॉझिटिव्ह आढळले हे पॉझिटिव्हिटी रेटवरून समजते. भारतात 20 जूनला हा रेट 6 टक्क्यांच्या पुढे होता. सध्या हा रेट 7.09च्या  जवळपास आहे. अधिक कोरोना प्रभावित राज्यांमध्ये हा अधिक आहे. जसे महाराष्ट्रात हा रेट 19 टक्क्यांपर्यंत आहे.

लोकसंख्येच्या दृष्टाने आकडा अधिक नाही -जागतीक कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारताचा वाटा वाढणे हे निश्चितपणे चिंताजनक आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार करता तेवढे चिंताजनकही नाही. कारण जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा 17.5 टक्के एवढा आहे.

देशभरात एकाच दिवसात २७,११४ नवे रुग्णदेशभरात शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे २७ हजार १४४ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ इतकी झाली आहे. या संसर्गाने आणखी ५१९ जण मरण पावले असून बळींची संख्या २२ हजार १२३ इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले. देशात अवघ्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सात लाखांवरून आठ लाखांवर गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टर